शिरपूरचा “विकास”,शेतकरी अन् आमदार कुणाल पाटील…

बातमी कट्टा:- राजकारण म्हटल की निवडणूका, प्रचार,आश्वासन त्यात काही खोटे आश्वासने वगैरे असे अनेक चित्र डोळ्यासमोर निर्माण होत असतात.गेल्या काही दिवसांपासून आम जनतेला अनेक गोष्टींना सामोरे जावे लागत असल्याचे आपण बघत आहोत विशेष म्हणजे शेतकरी वर्गाला अनेक संकाटांचा सामना करावा लागत आहे.अनेक दिवसांपासून पाऊसाच्या लहरीपणामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भोगावे लागत आहे. त्यात जनावरांना होणारा स्किन डिसीज आजारांमुळे देखील शेतकरी परेशान झाला आहे. मात्र असे असतांना किती नेते मंडळी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले असतील तर ते बोटावर मोजण्या ईतकेत म्हणावे लागेल.मुळात हवेत उडणाऱ्या नेते मंडळींना शेतकऱ्यांची अवस्था त्यांची व्यथा याच्याशी काही घेन देन नाही. मात्र जे नेते मंडळी जमीनीवर असतात ते कधीही आपल्या लोकांसाठी आम जनतेसाठी,आणि शेतकऱ्यांसाठी धावत असतात. आता तुम्हीच बघा शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवल्यानंतर अनेक मंडळी फक्त निवेदन देतांना आपण बघितले मात्र अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना धिर देत शेतकऱ्यांचा बांधावर पोहचणारा नेता आपण सर्वांनी अनुभवला ते म्हणजे आमदार कुणाल पाटील.

त्याचे कारण असे की ज्या वेळेस पाऊसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले होते.शेतकरी आर्थिक संकटात होते.तेव्हा काही नेते मंडळी लाखोंचा शाहीथाट कार्यक्रमात मग्न होते.मात्र एकीकडे आमदार कुणाल पाटील हे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचून परिस्थितीचा आढावा घेत शेतकऱ्यांना धिर देतांना दिसत होते.शेतकऱ्यांच्या बांधावर संबधित सर्व अधिकार वर्ग बोलावून बैठक घेत जागेवर पंचनामा करुन घेत होते.आता काही दिवसांपासून जिल्ह्यातील पाळीवर जनावरांमध्ये स्किन डिसीज हा आजाराचा फैलाव होतांना दिसत आहे.या आजाराचा शिरपूर तालुक्यातील जनावरांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे.यामुळे पशुपालक हैराण झालेत मात्र याबाबत एक चिकार शब्द देखील शिरपूर तालुक्याचे नेते मंडळी काढतांना आपल्याला दिसलेले नाहीत.शिरपूर तालुक्यात फक्त विकास, विकास अन विकास नावाने ढोलकी वाजवत फिरवले जाते मात्र याच तालुक्यातील शेतकरी विकासापासून किती वंचित आहे याच्याशी नेते मंडळींना काही घेनदेन नाही. अन तिकडे आमदार कुणाल पाटीलांनी जनावरांवर होणाऱ्या आजारामुळे पशुपालक परेशान असल्याचे बघत मंत्री सुनिल केदार यांना निवेदन देऊन यावरील लस त्वरीत उपलब्ध करुन द्यावे याबाबत निवेदन सादर केले आहे.

शिरपूर तालुक्यातील नेते मंडळी हायकमांडच्या पुढारींना बोलावून विकासाचा डंका राज्यात वाजवून घेतात मात्र येथील आमजनता,शेतकरी यांच्यासाठी येथील नेते मंडळी किती कर्तव्यदक्ष आहे हे आपण बघु शकतो.कारण तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात असतांना लाखोंचा खर्च करून शाहीथाट सुरु होता.तर दुसरी कडे आमदार कुणाल पाटील शेतकऱ्यांना धिर देत पंचनामे करुन घेत होते आणि आता तर जनावारांवर येणाऱ्या स्किन डिसीज आजाराच्या लसीकरण बाबतीत देखील आ.कुणाल पाटील यांनी मंत्रींकडे मागणी केली आहे.मग आमदार कुणाल पाटील शेतकऱ्यांसाठी नेहमी धावतांना दिसत असतात तर शिरपूर तालुक्याचे नेते मंडळी का धावत नाहीत ? हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.मात्र आमदार कुणाल पाटील यांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी धिर देत शेतकऱ्यांसाठी दाखवलेले प्रेम,मया ही शिरपूर तालुक्यातील नेते मंडळींना देखील येवो एवढीच अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

WhatsApp
Follow by Email
error: