शिरपूरच्या दारूची दुर्गंधी मुंबईपर्यंत !बंद जिनींग मध्ये बनावट देशी दारुचा कारखाना, कोटींचा मुद्देमाल जप्त…

यासह व्हिडीओ बघण्यासाठी लिंकवर क्लिक करा व चैनल सबस्कराईब करा

बातमी कट्टा:- मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गलगत बनावट दारूचा देशी कारखाना पोलिसांनी उध्दवस्त केला आहे.सुमारे 1 ते सव्वा कोटींपेक्षा जास्तीचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला असून 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.मुंबईच्या महाराष्ट्र राज्य भरारी पथकाने सदर कारवाई केली आहे.अजंदे खुर्द येथील बंद जिनींग मिल मध्ये हा संपूर्ण प्रकार उघड झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार

आज दुपारी महाराष्ट्र राज्य भरारी पथकाचे पोलीस निरीक्षक संताजी लाड,मनोज चव्हाण,बि.आर नवले,एस आर नजन आदींसह पथकाने मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील अजंदे शिवारातील जिनींग मिल येथे सुरु असलेल्या बनावट देशी दारुचा कारखाना सुरु असतांना पोलिसांनी छापा टाकला.तेथे काम करणारे तीन संशयितांना यावेळी पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे.

मुंबई पोलीस निरीक्षकांना मिळाली होती गोपणीय माहिती..

या कारवाई साठी महाराष्ट्र राज्य भरारी पथकाचे मुंबई येथील पोलीस निरीक्षक संताजी लाड यांना गोपणीय माहिती प्राप्त झाली होती.आज दि 9 रोजी पोलीस निरीक्षक संताजी लाड यांनी धुळे येथील पथकाला सोबत घेत आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास कारवाई केली आहे.

पोलीस देखील चकीत झालेत…

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत चक्क एका बंद जिनींग मिल मध्ये बनावट दारुचा कराखाना सुरु होता पोलिसांनी छापा टाकला असता तेथे सर्व कंपनींच्या दारुचे बॉटलस, झाकनसह स्पिरीटने भरलेले ड्रम,या साठी लागणारे मशनरी, आदींसह सुमारे सव्वा कोटींपेक्षा जास्तींचा मुद्देमाल बघुन पोलीस देखील अवाक झाले होते.

चार ते पाच गुदामात सुरु होते कारखान्याचे काम..

ज्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला तेथे चार ते पाच गोडाऊनात संपूर्ण हा कारखाना सुरु होता.एका गुदामात बनावट दारु बनवणे,एका गुदामात स्पिरीटचे ड्रम ,एका गुदामात विक्रीसाठी देण्यात येणाऱ्या बनावट दारुने भरलेले बॉक्स अशा पध्दतीने प्रत्येकाचे वेगवेगळ्या पध्दतीने विभाग बनवून ठेवण्यात आले होते.विशेष म्हणजे या ठिकाणी जनरेटरची देखील सोय करुन ठेवण्यात आली होती .

पोलिसांनी छापा टाकला तेव्हा तीन संशयितांना ताब्यात घेतले हे तिनही संशयित स्थानिक नसुन बाहेर राज्यातील असल्याचे पोलिसांना समजले.मात्र यामागील मोहरक्या दुसरा असुन तो पोलिसांना मिळुन आलेला नाही.पोलिसांनी बनावट दारुच्या कारखानासह आयशर,जिप व मोटरसायकल देखील ताब्यात घेतले आहे.रात्री उशिरापर्यंत सदर कारवाई सुरु होती.

WhatsApp
Follow by Email
error: