बातमी कट्टा:- स्मार्ट सिटी म्हणून परिचित असलेल्या शिरपूर तालुक्यात अवैध व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.धुळे शहरात अवैध व्यवसायांवर कारवाई होते मग शिरपूर तालुक्यात कारवाई का होत नाही.दिवसेंदिवस वाढ होत असलेल्या या अवैध व्यवसायांना खतपाणी घालणारे नेमके कोण ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
शिरपूर शहरात अवैध व्यवसायाने धुमाकूळ घातला आहे.अवैध व्यवसायाला कुठल्याच प्रकारचा धाक राहिलेला दिसत नाही.सर्रास सुरु असलेल्या या अवैध व्यवसायांवर ठोस कारवाई का होत नाही असा सवाल उपस्थित होत आहे.अवैध व्यवसायांवर कारवाई झालीच तर ती फक्त किरकोळ कारवाई करण्यात येत असते.
धुळे येथे आयपीएस एस.ऋषीकेश रेड्डी यांनी अवैध व्यवसायांविरुध्द कारवाई सुरू केल्याने अवैध व्यवसायधारकांचे धाबे दाणाणले आहे.धुळ्यात सुरु असलेली कारवाई शिरपूरात देखील होणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस वाढ होत असणाऱ्या या अवैध व्यवसायांना खतपाणी घालणारे नमके कोण ? असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे.अवैध व्यवसायांवर थातूरमातूर कारवाई न होता मोठी कारवाई होईल का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.