
बातमी कट्टा:- शिरपूरात मध्यरात्रीच्या सुमारास दुकानात चोरी झाल्याची घटना घडली आहे. आज दि 4 रोजी एककीडे शिरपूर शहर पोलीसांनी लाल कार्पेट टाकून पोलीस स्टेशनात आयजींचे स्वागत केले आणि दुसरीकडे शहरातील दुकानातून 7 -8 लाखांची कॉपर वायर चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार नाशिक परिक्षेत्राचे आयजी बि.जी.शेखर पाटील यांचे शिरपूर शहर पोलीस स्टेशनात आज दि 4 रोजी लाल कार्पेट टाकून जंगी स्वागत करण्यात आले.सकाळपासून पोलीसांची सुरु असलेली धावपळ बघून नागरिक देखील अवाक झाले.कधी नव्हे पोलीस स्टेशनात ईतकी स्वच्छता व वाहनांबाबत घेतलेली दक्षा पाहून कोणीतरी मोठे अधिकारी येत असल्याचे नागरिकांना कळाले.आयजी बि.जी.शेखर पाटील यांची शिरपूर शहर पोलीस स्टेशनात आगमन आले आणि पोलीसांना समजले की शिरपूर शहरातील महाराजा काँम्पलेक्श मधील वर्धमान ट्रेडींग कंपनी दुकानात चोरी झाली.घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चारचाकी वाहनात संशयित आल्याचे दिसून आले आहे.दुकान मालक अतुल हसमुख जैन यांनी दिलेल्या माहिती नुसार चोरांनी दुकानातून कॉपर वायरचे एकुण 42 बंडल व ईतर असा अंदाजे 7 ते 8 लाखांची चोरी झाल्याचे सांगितले. घटनास्थळी उपनिरीक्षक संदिप मुरकुटे व शोध पथकाचे कर्मचारी दाखल झाले होते.
