
बातमी कट्टा:- शिरपूरात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे.रॅपिड अँटीजन टेस्ट तपासणीत शिरपूर तालुक्यात चार जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात रॅपिड अँटीजन तपासणी करण्यात आली होती.त्या तपासणीत शिरपूर शहरातील चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे उघड झाले आहे.यामुळे आरोग्य प्रशासन पुन्हा सतर्क झाले आहेत.शिरपूर शहरातील
गायत्री कॉलनी शिरपूर १, वाल्मिक नगर पहिली गल्ली २
लालबहादूर शास्त्री नगर १ असे एकुण चार रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
