बातमी कट्टा:-शिरपूर येथे दारूच्या पैशांच्या उधारीतून व मागील भांडणाच्या रागातून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना काल दि २३ रोजी सायंकाळी घडली आहे.याबाबत संशयितांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी राकेश सुदाम कोळी रा.वाल्मिक नगर शिरपूर याने शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीत म्हटले की दि.२३ रोजी दुपारी ०२.३० ते ०३.०० वाजेच्या सुमारास किस्मतनगर येथील सुंदरवाड़ी रोडावर फिर्यादीचा भाऊ राजु सुदाम कोळी वय ३२, व्यवसाय-मजुरी, यास दारुच्या पैशाच्या उधारीवरुन व मागील भांडणाच्या मनात राग धरून योगेश कोळी, बंटी कोळी, दिपक कोळी, छोटु कोळी अशांनी शिवीगाळ करुन त्याच्या डोक्यावर, पाठीवर, पोटावर, तोंडावर हाताबुक्यांनी मारहाण केली.राजु कोळी याला घरी आणले तेव्हा त्याच्या कानातून रक्तश्राव होत होता.सायंकाळी राजुला जेवणासाठी उठवायले गेले असता तो उठला नाही त्यास शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.याप्रकरणी योगेश कोळी,बंटी कोळी, दिपक कोळी, छोटु कोळी आदीं विरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.