शिरपूरात गोळीबार,24 वर्षीय तरुणाचा मृत्यू…

बातमी कट्टा:- शिरपूर शहरातील रामसिंग नगर येथे गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.गावठी पिस्टल मधून स्वतावरच गोळी झाडत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.घटने मागील कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

याबाबत वृत्त असे की रामसिंग नगर येथील हर्षल भिका माळी वय 24 या तरुणाने रात्री 11 वाजता स्वताच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.घटनेनंतर हर्षल माळीला उपचारासाठी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे.डोक्यातून रक्त प्रवाह अधिक होत असल्यामुळे रुग्णालयातील डॉ कदम यांनी पुढील उपचारासाठी धुळे येथे पाठवले आले होते. परंतु हर्षल माळी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

WhatsApp
Follow by Email
error: