बातमी कट्टा अमोल राजपूत 9404560892 :- शिरपूरात वेळीच गुन्हेगारीवर आळा बसला नाहीतर एक दिवस या गुन्हेगारीचा मोठा उद्रेक होईल हे शिरपूरात वाढत असलेल्या गुन्हेगारी प्रकरणांमधून दिसून येत आहे.शहरात गुंडगिरी का वाढत आहे ? गंडगिरीला खतपाणी कोण घालतयं याकडे वरिष्ठ पोलीस प्रशासनाने लक्ष देणे अपेक्षित आहे.
पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांची अचानक बदली करुन पोलीस निरीक्षक ए एस आगरकर यांच्या हाती शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे निरक्षीक पद देण्यात आले.पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्विकारला आणि दुसऱ्याच दिवशी शहरात दोन गटात दगडफेक झाली.रोज संध्याकाळी शहराच्या मेनरोडवर फिरुन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता.यावरून शहरात पोलीसींग टिकून राहील असे वाटत होते.मात्र तसे झाले नाही.शहरात पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली.
त्यानंतर शहरातील गुन्हेगारीवर पोलीसांचा पुर्णपणे वचक संपला.आणि यामुळेच कदाचित भरदिवसा चाकूने भोसकून तरुणाचा निर्घृण खूनाची घटना घडली.त्याच सोबत अनेकवेळा हाणामारी,दोन गटांमध्ये फ्रि स्टाईल हाणामारी या घटनांमध्ये वाढ होतांना दिसत आहे.या पध्दतीनेच दिवसाढवळ्या चोऱ्या,घरफोड्या त्यासोबतच
चेन स्नॅचिंग सारख्या घटना घडत आहेत.
पोलीसांचा वचक संपल्यामुळे शिरपूर शहरात गुंडगिरी फोफावत असून या गुंडगिरीला नेमकं खतपाणी कोण घालतंय? याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.शिरपूरात वेळीच गुन्हेगारीवर आळा बसला नाहीतर एक दिवस या गुन्हेगारीचा मोठा उद्रेक होईल हे नक्की !