बातमी कट्टा:- धुळे जिल्ह्यात अपघाताची वाढती संख्या बघता अपघाताला आळा बसावा या हेतूने संभाजीनगर येथून आलेल्या सुमित पंडीत या समाजसेवकाने जुनिअर चार्ली चापलीनची वेशभूषा धारण करुन शिरपूर शहरातील प्रमुख ठिकाणी व बसस्थानकात पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली यावेळी शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सुमित पंडीत हे संभाजीनगर येथील असून ते जुनिअर चार्ली फॉऊंडेशनच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात सुरक्षितता पाळा अपघात टाळा असा संदेश देत आहेत.समाजसेवक सुमित पंडित यांनी ट्राफिकचे नियम आपल्या मुख अभिनयातून ज्युनिअर चार्लीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला ज्युनिअर चार्ली तथा समाजसेवक सुमित पंडित यांनी आपल्या हास्यकलेतून लोकांना ट्राफिकचे संपूर्ण नियम समजून सांगण्यासाठी आपल्या मूक अभिनयातून जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे ट्राफिक पोलीसांना त्यांची मदत होत आहे.
आज सुमीत पंडीत हे जुनिअर चार्ली बनून शिरपूर शहर पोलीसांसोबत अपघात टाळण्यासाठी शहरातील करवंद नाका गुजराथी कॉम्पलेक्स व बसस्थानकाच्या ठिकाणी बॅनर,हेल्मेट विषयी व चोरी संदर्भात जनजागृती करून ज्या नागरिकांनी हेल्मेट घातले होते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन पोलिसांच्या वतीने सन्मान करण्यात आले.
बघा व्हिडीओ https://youtu.be/UPkS_irTGbU
धुळे पोलिस अधिक्षक संजय बारकुंड,अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पोलीस निरिक्षक अन्साराम आगरकर,पोलीस उप निरिक्षक संदिप मुरकुटे,किरण बाहरे,गणेश कुटे,व शोधपथक शिरपुर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युनिअर चार्ली च्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.