
बातमी कट्टा:- हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या नर्सचा ओढणीने गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याची घटना घडली आहे.शिरपूर येथे राहत असलेल्या रुममध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत आज सकाळी मृतदेह आढळून आला असून मृत अवस्थेत शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहरातील वरवाडे परिसरात शारदा सॉमील जवळील ज्ञानेश्वर रामदास धनगर घरमालक वय 64 यांनी हॉस्पिटलमध्ये नर्सचे काम करणाऱ्या मुलींना घर भाडे कराराने दिले होते.काही महिन्यापूर्वी शिरपूर तालुक्यातील बुडकी येथील सपना सोमा पावरा वय 21 ही तेथे राहण्यासाठी आली होती. सपना पावरा ही राधाकृष्ण हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कामाला होती.
आज सकाळी हॉस्पिटल येथे कामाला जाण्यासाठी सपना पावरा रुमच्या बाहेर निघाली नसल्याने सोबत राहत असलेल्या मुलींनी तिचा दरवाजा ठोकून आवाज दिला मात्र आतून कुठलाही आवाज आला नसल्याने त्यांनी दरवाजा उघडला असता सपना पावरा हिचा ओढणीच्या साह्याने गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला.या बाबत शिरपूर शहर पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी करण्यात आली. सपना पावरा हिचा मृतदेह शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही.
