बातमी कट्टा:- शिरपूरात चोरी,घरफोडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून काल दि 22 रोजी देखील भरदिवसा गजबजलेल्या कॉलनीत घरफोडी झाली आहे. यामुळे शहरातील नागरिक भयभीत झाले असून याकडे वरिष्ठ पोलीस अधिकारी दखल घेतली का ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त होत आहे.
शिरपूरात वाढत्या चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असतांना घरफोडी चोरी रोखण्यात पोलीस मात्र अपयशी ठरत असून याकडे वरिष्ठ पोलीस अधिकारींनी लक्ष देणे अपेक्षित आहे.काल दि 22 रोजी शिरपूर येथील सुभाष कॉलनी येथे भरदिवसा घरफोडीची घटना घडली. सुभाष कॉलनी येथील जयश्री शशिकांत कुलकर्णी वय 50 वर्ष यांनी शहर पोलीस स्टेशनात फिर्याद दिली असून त्यात त्यांनी म्हटले की,दि 22 रोजी सकाळी 7 वाजता घर लॉक करून ते कामाला गेले होते.दुपारी घरी 1 वाजता जयश्री कुलकर्णी या घयी परत आले असतांना घरातील दरवाजाचा कडीकोंडा तुटलेला आढळून आला.घरात बघितले असता घरातील कपाट उघडे मिळुन आले.त्यात ठेवलेले सोने चांदीचे दागिने व 43 हजारांची रोकड असा 98 हजारांची चोरी झाल्याचे दिसून आले.याबाबत जयश्री शशिकांत कुलकर्णी यांनी शिरपूर शहर पोलीस स्टेशन यांना संपर्क करत घटनेची माहिती दिली घटनास्थळी पोलीस निरीक्षक ,उपनिरीक्षक यांच्या सह शोध पथक दाखल झाले.श्वान पथक व फॉरेन्सिक टिम घटनास्थळी दाखल होत कार्यवाही करण्यात आली. भरवस्तीत भरदिवसा घरफोडी झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.याआधी देखील दोन दिवसापूर्वी घरफोडीची घटना घडली होती.वारंवार शहरात सुरू असलेल्या चोरी,घरफोडीच्या वाढत्या घटनांकडे वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष देतील का ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त होत आहे.