शिरपूरात प्रशासन सुस्त अन् चोरटे मस्त,आठवड्याभरात तीन घरफोड्या…

बातमी कट्टा:- शिरपूरात कायदा सुव्यवस्थेचचे अक्षरशः तिनतेरा झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.चोरी घरफोडींमुळे शिरपूरकरांकडून चिंता व्यक्त होत आहे.तीन ते चार दिवसांत तीन ठिकाणी चोरी झाली असून यात दोन घरफोडी एका कपड्याच्या दुकानात चोरी झाली आहे.या वाढत्या घटनांमुळे शिरपूरात व्यापारी ,दुकानदार आणि सर्वसामान्य नागरिक सुरक्षित नसल्याचे चित्र आता स्पष्ट होत आहे.

शिरपूर शहरात चोरीचे वाढते स्वरूप आणि त्यासोबत गुन्हेगारीला मिळणारे खतपाणी बघता शिरपूरात व्यापारी ,दुकानदार आणि सर्वसामान्य नागरिक सुरक्षित नसल्याचे चित्र आता स्पष्ट होत आहे.याआधी शहरात गुन्हेगारी चोरीचे प्रमाण वाढल्यानंतर राजकीय नेत्यांकडून मोर्चे काढून याबाबत निषेध व्यक्त करण्यात आला होता.मात्र आता तर चोरी घरफोडी नित्याचे होत आहे. याकडे आता कशा पध्दतीने बघितले जाते याकडे सर्व जनतेचे लक्ष आहे.

तीन ते चार दिवसांपूर्वी शिरपूर शहरातील गायत्री कॉलनीत घरफोडीची घटना घडली होती.त्यानंतर सुभाष कॉलनीत घरफोडीची घटना घडली यात सोने दागिन्यांसह सुमारे तीन लाखांची घरफोडीत ऐवज चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.याआधी देखील सुभाष कॉलनीला चोरांनी टार्गेट केले आहे. कधी घरफोडी तर कधी चारचाकी वाहन चोरल्याने कॉलनी परिसर भयभीत झाले.यात आणखी काल परवा सुभाष कॉलनीत घरफोडी होऊन तीन लाखांचा एवज चोरी झाला .आज तर चोरीची हद्द पार झाली असून शहरातील मेनरोडवरील गुजराथी कॉम्प्लेक्स जवळ असलेल्या कपड्याच्या दुकानात चोरी झाल्याचे सकाळी उघड झाले आहे. कपड्यांच्या दुकानात काय आणि किती चोरी झाली याबाबत चौकशी सुरु आहे.मात्र शिरपूर शहरात वाढत्या चोरी आणि गुन्हेगारीच्या घटनांमुळे शिरपूरात व्यापारी, दुकानदारांसह सर्वसामान्य नागरिक देखील सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होत आहे.

WhatsApp
Follow by Email
error: