बातमी कट्टा:- शिरपूरात चोरीच्या दिवसेंदिवस घटना वाढत आहेत. भरदिवसा महिलांच्या गळ्यातील सोनपोत ओढून घेऊन गेल्याची दोन वेळा तक्रारीनंतर मोटरसायकली चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच शहरात आणखी एका घरफोडीची घटना उघड झाली आहे.

शिरपूर शहरातील मयूर कॉलनीत निखिल सूर्यवंशी कुटुंबातील सदस्य बाहेरगावी गेले गेले असता बंद घर दिवसा फोडून चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शुक्रवारी १६ जुलै रोजी सायंकाळी उशिरा समोर आली आहे.शहरातील वरझडी रोडवरील मयूर कॉलनीत निखिल सूर्यवंशी यांच्या प्लॉट क्रं ५ मध्ये चोरट्यांनी दागिन्यांसह रोकडवर डल्ला मारल्याचे समोर आले आहे चोरी झालेल्या प्लॉट क्रं ५ च्या जवळील घराचे बांधकाम सुरू असल्याने शुक्रवारी सायंकाळी घरमालक बांधकामाची पाहणी करीत असतांना निखिल सूर्यवंशी यांचा घराचा दरवाजा उघडा दिसून आल्याने सदर घटना उघडकीस आली.निखिल सूर्यवंशी यांचे वडील भटू लालसा सूर्यवंशी यांचे एका महिन्यांपूर्वीच निधन झाले असल्याने त्याची आई तळोदा येथे गेल्या आहेत.ते दुपारी बारानंतर घर बंद करून आईला घेण्यासाठी तळोदा येथे गेले त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी घराच्या बाजूला असलेल्या दरवाजाचा लॉक तोडून घरात प्रवेश करुन घरातील कपाट, डब्बा पर्स आदी ठिकाणांवर उचलपटक केली असल्याचे दिसून आले आहे.घरातील कोणीही सदस्य उपस्थित नसल्याने किती रक्कम गेली याची माहिती मिळू शकलली नाही. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पीएसआय सागर आहेर,पोना भरत चव्हाण,बापूजी पाटील,नरेंद्र शिंदे,प्रवीण गोसावी यांनी घटनास्थळी धाव घेत रात्री उशिरापर्यंत घरात व परिसरातील पाहणी केली