बातमी कट्टा:- महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशिराम पावरा यांच्या नेतृत्त्वाखाली शिरपूर येथे 2 एप्रिल 2023 रोजी भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या वतीने “स्वातंत्र्यविर सावरकर गौरव रथ यात्रा” काढण्यात आली. यावेळी शिरपूर शहर व तालुक्यातील मोठ्या संख्येने नागरिकांनी गौरव रथ यात्रेत सहभाग नोंदवला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशान्वये तसेच आ.अमरिशभाई पटेल व आ. काशिराम पावरा यांच्या नेतृत्त्वाखाली शिरपूर येथे स्वातंत्र्यविर सावरकर गौरव रथ यात्रा 2 एप्रिल 2023 रोजी सकाळी १०:३० वाजता शिरपूर शहरातील चोपडा जीन पासून मेन रोड, विजय स्तंभ पर्यंत काढण्यात आला.शहरातील पाचकंदील जवळ असलेल्या भाजपा कार्यालया समोर स्वातंत्र्यविर सावरकर गौरव रथ यात्रेचे समारोप करण्यात आले.
यावेळी आमदार अमरिशभाई पटेल,आ. काशिराम पावरा, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, सुभाष कुलकर्णी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी यांच्यासह तालुक्यातील विविध पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
व्हिडीओ बघण्यासाठी लिंक क्लिक करा https://youtu.be/DHs6hLy5d0A