बातमी कट्टा:- शिरपूरात पुन्हा एकदा हिंदु मुस्लिम एकताचे दर्शन बघावयास मिळत आहे.मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या आदर्श निर्णयामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी येत असल्याने आषाढी एकादशीच्या दिवशी कोणतीही कुर्बानी न देण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला आहे.या निर्णयाचा हिंदू बांधवांकडून स्वागत करण्यात आले.
आज दि 26 रोजी शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने शहर पोलीस स्टेशन परिसरात शांतता कमिटी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.आषाढी एकादशी आणि बकरी ईद दोन्ही सण एकत्र येत असल्याने बैठकीला शांतता कमिटीचे सदस्य यांच्यासह हिंदू व मुस्लिम धर्मातील बांधावांना बैठकीत बोलविण्यात आले.यावेळी शिरपूरचे
प्रांताधिकारी,पोलीस उपविभागीय अधिकारी ,तहसीलदार महेंद्र माळीमुख्याधिकारी तुषार नेरकर आदी जण उपस्थित होते.यावेळी शिवसेनेचे भरत राजपूत यांनी आपले मत व्यक्त करतांना सांगितले की,ऐन सणासुदीला विजेचा लपनडाव सुरु असतो.यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होतो.यामुळे प्रांताधिकारी यांनी महावितरण अधिकारींना देखील सुचना द्याव्यात.यावेळी भाजपचे अरुण धोबी म्हटले की आषाढी एकादशी निमत्त हिंदू बांधवांसाठी फराळाचे आयोजन करावे,तसेच शासनाचा नियमानुसार राहुन बकरी एकादशी साजरी करावी,तर बैठकीत शिवसेनेचे राजेंद्र गिरासे यांनी सांगितले की,बाळदे येथे आषाढी एकादशीला मोठ्या प्रमाणात गर्दी जाते.काही टवाळखोर मुलांमुळे रस्त्यावर पायी जातांना सर्वसामान्यांंना त्याचा त्रास होतो.त्यामुळे पोलीसांनी जास्तीची सुरुक्षा द्यावी.यावेळी ईरफान मिर्झा यांनी सांगितले की मुस्लिम समाजाने बैठक घेऊन हिंदूंचा आषाढी एकादशी सण असल्याने शिरपूरात बकरी ईदच्या पहिल्या दिवशी कुरबानी देणार असा निर्णय घेतला.यावेळी मौलाना अक्रम म्हणालेत की आपला हिंदूस्थान हा जगात सगळ्यात सुंदर देश आहे.विविध धर्म,विविध संस्कृती ,विविध भाषा,यामुळे हिंदु मुस्लिमांची मैत्री कधी तुटणार नाही.यावेळी प्रभाकर चव्हाण बोलतांना म्हणालेत की,शांतता कमिटी बैठकीत आज सगळ्यात जास्त मुस्लिम बांधवांनी उपस्थिती दर्शवली,पहिल्या दिवशी कुरबानी होणार नाही हा संदेश तालुक्यात ग्रामीण भागात देखील जाणे आवश्यक आहे.
यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी बोलतांना म्हटले की,महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था साठी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तरुण पिढीने शोशल मिडीयावर बंधन घालावे,नंदुरबारात किरकोळ दगडफेक झाला होता यामुळे तीन महिन्यांपासून तरुण जेल मध्ये आहेत,पाळदी येथे देखील दंगलीनंतर कठोर कारवाई झाली
शिरपूरात कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केला तर कठोर कारवाई होईल.जिथे शांतता तिथेच विकास होईल. तालुक्यातील आदर्शमुळे जिल्हा पेक्षा शिरपूर तालुका मोठा वाटायला पाहिजे. शासनाच्या नियमीत गोवंश हत्या कायद्याचे पालन करून सण साजरा करणे आवश्यक आहे. यावेळी प्रांताधिकारी बोलतांना म्हणालेत की,शिरपूर तालुक्यातील मुस्लिम बांधावाचे मनापासून अभिनंदन कारण जिल्हाच नवे तर राज्यात शिरपूर तालुक्याचा आदर्श जाणे आवश्यक आहे.जिथे जाऊ तिथे शिरपूरचे आदर्श सांगू त्याबरोबर शेतकऱ्यांसाठी चांगला पाऊस झाला पाहिजे अशी देवाजवळ मागणी घालतो असे बोलून प्रांताधिकारी यांनी आपले भाषण संपवले.आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी येत असल्याने आषाढी एकादशीच्या दिवशी कोणतीही कुर्बानी न देण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतल्याने.या निर्णयाचा हिंदू बांधवांकडून जोराने टाळ्या वाजून स्वागत करण्यात आले.