शिरपूरात राष्ट्रवादीला झटका,उध्दव ठाकरेंच्या हस्ते बांधले शिवबंधन,

बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्षांसह माजी पदाधिकारी व काही कार्यकर्तेंनी आज शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.उध्दव ठाकरे यांच्या उपस्थित मुंबई येथे हा पक्ष प्रवेश संपन्न झाला.

आज दिनांक १६ सप्टेंबर रोजी शिवसेना(उबाठा) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते मुंबई येथील मातोश्री येथे शिवबंधन बांधून धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष युवराज पाटील,राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे माजी सरचिटणीस नितीन निकम,राष्ट्रवादीचे शरद पाटील यांनी शिवसेना (उबाठा) पक्षात जाहीर प्रवेश झाला.याप्रसंगी माजी मंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई,शिवसेना नेते अरविंद सावंत, धुळे जिल्हा संपर्कप्रमुख मा.अशोक धात्रक, नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख शरद पाटील, उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी संपर्क प्रमुख शुभांगी पाटील,सह संपर्कप्रमुख हिलाल अण्णा माळी, जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे,माजी महापौर भगवान करंकाळ,शिरपूर विधानसभा संपर्कप्रमुख रवींद्र धनावडे, उपजिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत, युवती सेना विस्तारक प्रियांका जोशी व जिल्ह्यातील शिवसैनिक यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा संपन्न झाला.

WhatsApp
Follow by Email
error: