शिरपूरात सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या 650 घरांचा प्रकल्प…

परवडणाऱ्या घरांकडे ग्राहकांचे आकर्षण गेल्या काही वर्षात वाढले आहे. यामध्ये लोकांना कमी किमतीत बजेट घरे दिली जातात. सरकारने याकडे पूर्ण लक्ष दिले आहे आणि या सेगमेंटमध्ये लोकांना अधिकाधिक घरे देण्यावर भर आहे. या अंतर्गत, गृह कर्जावरील व्याज, क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजना, यामुळे हा विभाग सर्वाधिक प्रचलित आहे. त्यामुळे स्माईल हौसिंग डेव्हलपमेंट प्रा. लि. कंपनी शिरपूर शहरातील भाड्याने राहणाऱ्या लोकांची गरज विचारात घेऊन “राधाकृष्ण नगरी” या नावाने करवंद, शिरपूर येथे ६५० परवडणाऱ्या घरांचा गृहनिर्माण प्रकल्प करत आहे.


राधाकृष्ण नगरी ह्या परवडणाऱ्या घराच्या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा दि. १५ ऑगस्ट २०२१ रोजी भूमीपूजन मा. आ. श्री. काशीरामजी पावरा (आमदार, शिरपूर विधानसभा) व मा. श्री. प्रभाकरराव चव्हाण (माजी नगराध्यक्ष, शिरपूर) यांच्या शुभहस्ते होऊन सदर प्रकल्प निर्माणास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
त्याच दिवशी दि. 15 ऑगस्ट ला 75 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कंपनीने प्रकल्पाच्या जागेवर करवंद गावचे सरपंच सौ. मनीषा देवेंद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन करून स्वातंत्र्यदिन साजरा केला.

सदर भूमिपूजन समारंभास मा. आ. श्री. काशीरामदादा पवार, मा. श्री. प्रभाकरराव चव्हाण (माजी नगराध्यक्ष, शिरपूर), मा. डॉ. श्री. तुषारजी रंधे (अध्यक्ष, जिल्हा परिषद, धुळे), मा. श्री. आबा महाजन (तहसिलदार, शिरपूर), मा. श्री. देवेंद्र पाटील (माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, धुळे), मा. अ‍ॅड. श्री. शांताराम महाजन (अध्यक्ष, वकील संघ, शिरपूर), तसेच कंपनीचे मुख्य संचालक श्री. माधब चौधरी, संचालक श्री. केशब चौधरी, सौ. मनीषा पवार, श्री. शालिक पवार (असिस्टंट कमिश्नर ऑफ एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज, मुंबई), अ‍ॅड. श्री राजेश मिश्रा (मुंबई हाय कोर्ट), श्री. सुदीप्त पात्रा (मॅनेजर, गृह कर्ज विभाग, मुंबई), श्री. मंगल मोंडल (वरिष्ठ अकाऊंटट, नवी मुंबई) तसेच इंजि. श्री. विजयसिंग पाटील, अ‍ॅड. श्री. अमोल चौधरी, प्रा. श्री. मनोज पाटील, श्री. संजीव पाटील, प्रा. श्री. कमलेश कुरणकर, श्री. गोपाल बोरसे, श्री. जितेश पवार, कंपनीचे इतर सदस्य सौ. सुरेखा कुरणकर, सौ. वर्षा बडगुजर, योगेश साळुंखे, जगदीश बोरसे, निरंजन जगदेव, आकाश पावरा, कंपनीचे सक्रिय सहकारी श्री. निलेश बडगुजर, श्री. महेंद्र बडगुजर, श्री. रोहिदास पावरा, श्री. सचिन बडगुजर व कंपनीचे भागधारक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर भूमिपूजन कार्यक्रमात मा. आ. श्री. काशीरामदादा पावरा यांनी सांगितले की सदर राधाकृष्ण नगरी प्रकल्प हा सामान्य लोकांसाठी अतिशय चांगला प्रकल्प असून सदर प्रकल्पात कंपनीने कर्ज सुविधा उपलब्ध करून दिल्याने सामान्य माणसाचे घर घेण्याचे स्वप्न देखील आपल्या मार्फत पूर्ण होणार आहे कारण सामान्य माणसाला कर्ज घेण्यासाठी बँकेत चप्पल झिजेपर्यंत चकरा माराव्या लागतात तरी त्याला कर्ज मिळत नाही त्यामुळे हा प्रकल्प वैशिष्ट्यपूर्ण आहे.


तसेच या प्रसंगी मा. डॉ. श्री. तुषारजी रंधे म्हणाले की शिरपूर मध्ये अशा प्रकारचा लक्षणीय प्रकल्प पहिल्यादांच होत आहे याची ख्याती पंचक्रोशीत पसरेल याबद्दल दुमत नाही. हाच धागा पकडून मा. श्री. आबा महाजन यांनी नमूद केले की शिरपूर मधील व आजूबाजूच्या सर्व भागात ह्या प्रकल्पाद्वारे अनेक कुटुंबाचे स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न या राधाकृष्ण नगरी तर्फे पूर्ण होत आहे याचा मला खूप आनंद आहे यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत प्रशासनामार्फत केली जाईल.
मा. श्री. प्रभाकरराव चव्हाण म्हणाले की २ ते ३ वर्षात करवंद गाव शिरपूर नगरपालिकेच्या अंतर्गत येईल. त्यामुळे रस्ते, रस्त्यावरील पथदिवे आणि दळणवळणच्या सर्व सुविधा लवकरच विकसित केल्या जातील.
राधाकृष्ण नगरी हा प्रकल्प सर्व सामान्य जनतेसाठी तसेच बऱ्याच वर्षांपासून भाड्याने राहणाऱ्या लोकांसाठी अतिशय उत्तम पर्याय म्हणून गृहनिर्माण प्रकल्प आहे. या प्रकल्पात ८ लाखात १ बीएचके तर १२ लाखात २ बीएचके घरे उपलब्ध होणार आहेत. सदर प्रकल्पामध्ये कंपनीने घर घेण्यासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली असून सदर घरांच्या किमतीत रजिस्ट्रेशन व डेवलपमेंट चार्जेस समाविष्ट आहेत. तसेच सदर घरे घेण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत अनुदान मिळणार आहे. सादर राधाकृष्ण नगरी प्रकल्प हा शिरपूर शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असून शिरपूर ते करवंद ये जा करण्यासाठी बस सुविधा उपलब्ध आहे. तसेच सदर प्रकल्पामध्ये अनेक अत्याधुनिक सोयीसुविधा देखील उपलब्ध करून दिल्या आहेत.


कार्यक्रमादरम्यान प्रथम भागधारक श्री. गौतम बोरसे, प्रथम मंदिरमुखी फ्लॅटसाठीचे भागधारक श्री. नानासाहेब दाभाडे तसेच प्रथम गुंतवणूकदार श्री. संजीव पाटील यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान २० भागधारकांना सोन्याचे नाणे देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी अनेक ग्राहकांनी आपली गृहकर्जाची पात्रता तपासून पाहिली. भूमीपूजनाच्या ठिकाणीच स्पॉट रजिस्ट्रेशन मध्ये देखील घरासाठी नोंदणी करण्यात आल्या. जनतेच्या मागणीमुळे ३१ ऑगस्टपर्यन्त घरांच्या किमती यथारूप ठेवण्याचा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने घेतला आहे.
राधाकृष्ण नगरीमध्ये आपणही आपल्या स्वप्नातील घर घेऊ इच्छित असाल तर लवकरात लवकर संपर्क करा.
पत्ता. खटाई प्लाझा, कृष्ण व्हॅली समोर, करवंद रोड, शिरपूर.क्र 02563-295863

WhatsApp
Follow by Email
error: