शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत उच्चशिक्षित तरुणाने अर्ज केला दाखल..

बातमी कट्टा:- कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपुरच्या 2023-2028 च्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी बिरसा फायटर्सचे नाशिक विभागीय अध्यक्ष तथा जामण्यापाडा ग्राम पंचायतचे सदस्य विलास पावरा यांनी मविआच्या पदाधिकाऱ्यांसमेत शेतकरी विकास पॅनेलकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.


शिरपूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला कधी नव्हे एवढे महत्त्व यावेळेस असल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत उच्चशिक्षित आणि ग्राम पंचायतचे पदाधिकारी असलेले तरूण थेट भाग घेत आहेत. महाविकास आघाडी कडून बिरसा फायटर्सचे नाशिक विभागीय अध्यक्ष तथा जामण्यापाडा ग्राम पंचायतचे सदस्य असलेले विलास पावरा यांनी काल बुधवारी आपला उमेदवारी अर्ज ग्राम पंचायत कोट्यातून दाखल केला. यावेळी राष्ट्रीवादी कांग्रेसच्या जनरल कामगार युनियन (शिसाक) चे मोहन पाटील,हेमराज राजपूत, मोहन पावरा आदी उपस्थित होते.

WhatsApp
Follow by Email
error: