बातमी कट्टा:- शिरपूर येथील बाजार समितीच्या संचालकपदाच्या 18 जागांसाठी आज रविवारी सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली.यावेळी 93.07 टक्के मतदान झाले असून सायंकाळी 5:30 वाजता शिरपूर बाजार समितीच्या आरकेव्हीवाय गोदामात मतमोजणीला सुरुवात झाली.यात व्यापारी मतदारसंघात दोन जागांसाठी पाच अर्ज दाखल होते.यात दोन उमेदवार विजयी झाले आहेत.
शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 18 जागांसाठी 37 उमेदवार रिंगणात आहेत.मतदनासाठी आठ टेबल ठेवण्यात आले आहेत.सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली यात 2619 मतदान झाले असून त्यानंतर सायंकाळी 5:30 वाजता शिरपूर बाजार समितीच्या आरकेव्हीवाय गोदामात मतमोजणीला सुरुवात झाली आहे.यात व्यापारी मतदारसंघातून दोन जागांसाठी पाच उमेदवारी अर्ज असून यात सतीश दगडुलाल जैन आणि आरपीत अग्रवाल उर्फ हणी हे विजयी झाले आहेत.
निवडणूक अधिकारी यांच्यासह तहसीलदार महेंद्र माळी, पोलीस निरीक्षक ए.एस आगरकर यांच्या मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन उपस्थित असून यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी मतमोजणी सुरु असलेल्या गोदामाच्या बाहेर गर्दी केली असून कोण विजयी होत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.