बातमी कट्टा:- दर वर्षी शंभर टक्के घरपट्टी भरणाऱ्या शिरपूर शहाराला पुन्हा 20 टक्के घरपट्टी कर वाढ झाली असून ती करवाढ रद्द करण्यात यावी यासाठी भाजप व भाजप युवा मोर्चाच्या वतीने शिरपूर वरवाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले की शिरपूर वरवाडे नगरपरिषदे मार्फत 20 टक्के घरपटी करवाढ करुन नागरिकांना बीले अदा केली जात आहेत.आज शिरपूर शहराची परिस्थिती पाहता मागील काळात कोव्हीड महामारीमुळे आणि अतिवृष्टीमुळे अधिकचा पाऊस यामुळे शेतकरी मजुर,दुकानदार,व्यापारी सर्व सामन्य जनता आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत. व अडचणींचा सामना करावा लागत असतांना नागरिकांना घरपट्टी भाडेवाढ म्हणजे आर्थिक संकटात अधिकची भर पडली आहे.शिरपूर वरवाडे नगरपरिषदे दर वर्षी १०० टक्के घरपट्टी वसुली भरणा करीत असतात.या गोष्टीचा विचार करुन शिरपूर वरवाडे नगर परीषद अवाजवी २० टक्के घरपट्टी कर वाढ रद्द करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी निवेदन देतांना यावर तोडगा निघाला नाही तर आंदोलनाचा ईशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी निवेदन देतांना भाजपाचे शहाराध्यक्ष हेमंत पाटील, जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी,युवा मोर्चा शराध्यक्ष विक्की चौधरी,मुकेश पाटील, संजय आसापुरे,नितीन गिरासे,श्रीकृष्ण शर्मा,महेंद्र पाटील, मुबीन इब्राहिम, रविंद्र राजपूत,अरविंद बोरसे,दिनेश सोनवणे,किरण कोळी, नागेश कोळी,गणेश माळी,शेखर कोळी,मंगेश कोळी, अमोल लोणारी,राहुल परदेशी,रोहित कोळी,अतुल सोनार,राजु धोबी आदी उपस्थित होते.