
बातमी कट्टा:- भरधाव ट्रक व टाटा 407 या दोन वाहनांमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली आहे.या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी झाला आहे.अब्दुल सगीर शेख जामीर वय 20 व अब्दुल फारुक गुलाम मतीम मु पो ता.बाळापूर जिल्हा अकोला असे मयतांची नावे आहेत.या अपघातात टाटा 407 वाहन अक्षरशः चक्काचूर झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार अकोला येथून शिरपूर येथे कापसाचे बियाणे वितरीत करून चोपडा येथे जाणाऱ्या एम एच 43 एफ 0842 क्रमांकाच्या टाटा 407 वाहनाला शिरपूर तालुक्यातील तरडी जवळ चोपडाकडून शिरपूरच्या दिशेने येणाऱ्या आरजे 40 जीऐ एफ 4822 क्रमांकाच्या भरधाव ट्रकने समोरून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला.

यात चालक अब्दुल सगीर शेख जामीर वय 20 व अब्दुल फारुक गुलाम मतीम वय 21 या दोघांचा जागीच मृत्यू झाला.सदर अपघात एवढा भीषण होता की टाटा 407 वाहनाचा चक्काचूर झाला आहे. तर बियाने रस्त्यावर विखुरले गेले.अपघातानंतर अज्ञात ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला.अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी धाव घेत मदतकार्य करून मयतांना वाहनाबाहेर काढून शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.रुग्णालयातील डॉ.हिरेन पवार यांनी तपासणी करून मयत घोषित केले याप्रकरणी पुढील कारवाई थाळनेर पोलिसांकडून सुरू आहे.
