
बातमी कट्टा:- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शिरपूर तालुकाध्यक्ष आशिषकुमार अहिरे यांच्या नेतृत्वाखाली आज शिरपूर येथील मुख्य बाजारपेठेतील पाताळेश्वर मंदिर जवळील शहीद स्मारकाच्या ठिकाणी केंद्र सरकारने ठेकेदारी पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या सैनिक भरती प्रक्रियेला विरोध दर्शवित आंदोलन करण्यात आले.

यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत परिसर दणाणून गेला होता. त्यानंतर प्रांत कार्यालय येथे जाऊन उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी व्यापार-उद्योग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री दिनेशदादा मोरे,तालुका अध्यक्ष श्री.शिरीषदादा पाटील,कांतीलाल पाटील, निलेश गरुड, अर्जुन पाटील, संजय पवार, वाजिद शेख,डॉ.राहुल साळुंखे, युवक संघटनेतील अभय करंकाळ, ऍड. समाधान भवरे, भावेश शिरसाठ कुबेर, मोतीलाल पावरा,राजपूत विकास साबळे, समाधान पाटील, सचिन कोळी, गौतम थोरात,संभाजी पाटील, बाळकृष्ण पाटील गोलू पाटील गोपाल पाटील इमरान शेख आसिफ कुरेशी, देविदास कोळी आदी बहुसंख्येने उपस्थित होते.
