
बातमी कट्टा:- एखादी वस्तू जुनी किंवा तीला चमक अणायची असणार तर त्यावर पॉलीश करण्यात येत असते यामुळे वस्तूच्या आतील भाग कसा का असेना मात्र पॉलीश मारल्याने वरील भाग चमकत असतो.अशाच पध्दतीने शिरपूर तालुक्यातील राजकीय मंडळींमध्ये दिसून येत आहे.शिरपूर तालुक्याचा विकास सांगतांना व त्याचा उदोउदो करतांंना तालुक्यातील महत्वाचे प्रकल्प कशा पध्दतीने बंद आहेत याकडे साहजिकच दुर्लक्ष केले जात आहे.यामुळे तालुक्यातील फक्त शहरापुर्ता वरवर विकास करणाऱ्यांनी साखरकारखाना,दुध संघ याअडे देखील लक्ष देणे अपेक्षित होते.
शिरपूर तालुका हा पुर्वीपासून सुजलाम सुफलाम तालुका आहे.म्हणजेच पुर्वी तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊसाचे उत्पन्न घेत होते.त्यावेळच्या नेत्यांना तालुक्यातील शेतकऱ्याबाबत दूरदृष्टी होती.त्यामुळे साखरकारखाना असेल दुध संघ असेल किंवा अनेर धरण असेल आदी गोष्टींसाठी त्यावेळी त्यांनी प्रयत्न केला होता.
अस म्हटल जात की सगळ्यात तालुक्यातून सगळ्यात जास्त दुधाचे संकलन करुन ते मुंबईला पाठवण्यात येत होत तर खान्देशात त्यावेळी सगळयात मोठा ऊसाचा कारखाना म्हणून शिरपूर साखर कारखाना उभा होता.मात्र आता दुर्दैवाने तस काही एक राहिलेले नाही.
आता नेत्यांनी रस्त्यासाठी करोडोंचा निधी आणला बाबत गवगवा करण्यात येत आहे.शिरपूर तालुक्याला जोडणारे निम्मे रस्ते आजतोवर खड्डेमय होते.यावर आजपर्यंत अनेकवेळा निधी खर्च करण्यात आला.मग आपण आणत रस्त्यांसाठी आणत असलेला निधी त्याचा कशा पध्दतीने वापर करण्यात येत आहे याची चौकशी का केली जात नाही.निधींचा बफारा देऊन निकृष्ट कामांवर का बोलल जात नाही.
शिरपूर तालुक्यातील विकासच करायचा ना ! येथील जनतेची आपणास काळजी आहे ना मग साखरकारखाना सारखे तालुक्यातील महत्वाचे प्रकल्प का सुरु होत नाहीत ? रस्त्यासाठी इतका निधी आणला तितका निधी आणल्याचे फोटो व सोशल मिडीयावर बॅनरबाजी करण्यात येत असते मग साखर कारखाना बंद बाबत पण बॅनरबाजी करा की ! करोडोंच्या निधी पेक्षा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा प्रकल्प सुरु होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.यासाठी काय प्रयत्न करण्यात येत आहे त्याबाबत समजू द्या तालुक्यातील जनतेला !