
बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेतील भाटपुरा गटात केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमाने देण्यात आलेल्या निधी व त्यातून पूर्णत्वास आलेल्या कामांचे लोकार्पण, भूमिपूजन व उद्घाटन सोहळा धुळे नंदुरबार जिल्ह्याचे खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
बघा व्हिडीओ लिंक क्लिक करा https://youtu.be/_xt5DyFPRYs?si=kA9hSkkm8LgVTDRo
याप्रसंगी तालुक्यातील नांथे गावात एक कोटी वीस लाख पन्नास हजार रुपयांच्या विविध कामांचे लोकार्पण उद्घाटन संपन्न झाले. तालुक्यातील नांथे हे गाव शंभर टक्के राजपूत समाजाचे गाव असून या गावात तालुक्यात प्रथमच राष्ट्र गौरव महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे उभारणीचे काम अनेक वर्षांपासून सुरू होते. मात्र निधी अभावी काम रखडले होते. याबाबत निधी प्राप्त होण्यासाठी गावातील युवकांनी राहुल गांधी यांच्याकडे व जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
बघा व्हिडीओ लिंकवर क्लिक करा https://youtu.be/_xt5DyFPRYs?si=kA9hSkkm8LgVTDRo
त्यानुसार या कामासाठी शासन स्तरावरून पुतळा परिसरातील सुशोभीकरण या कामांसाठी पंधरा लाख रुपयांच्या भरघोस निधी खासदार हिना गावित यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला होता. या कामास सुरुवात झाली असून लवकरच काम अंतिम टप्प्यात येणार आहे. त्यामुळे शिरपूर तालुक्यात प्रथमच राष्ट्र गौरव महाराणा प्रताप सिंह यांच्या पुतळा उभारण्याचे स्वप्न साकार होणार आहे.यापूर्वी या कामासाठी तालुक्यातील अनेक लोक प्रतिनिधींकडे युवकांनी पाठपुरावा केला होता मात्र कोणीही प्रतिसाद दिला नव्हता. मात्र आता खासदारांच्या मदत निधीने सदरचे काम पूर्णतः येत आहे.
बघा व्हिडीओ https://youtu.be/_xt5DyFPRYs?si=kA9hSkkm8LgVTDRo
यावेळी खासदार गावित यांनी माझ्या हातून एका महापुरुषाच्या पुतळा बांधकाम परिसरात सुशोभीकरणासाठी मदत करता आली म्हणून आनंद व्यक्त केला. यापुढे देखील गाव पातळीवरील सर्व लहान मोठ्या कामांसाठी शासनाच्या माध्यमाने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यास मी कटिबद्ध असून आगामी काळात होणाऱ्या लोकसभेसाठी पुन्हा एकदा जनतेने माझ्या पाठीशी उभे राहून आशीर्वाद द्यावे अशी विनंती त्यांनी केली. यावेळी या परिसरात मोठ्या प्रमाणावर सजावट करण्यात आली होती. आणि खासदार गावित यांच्या स्वागतासाठी रांगोळी काढून त्यांचे कलर रेखाचित्र साकारण्यात आले होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे, सामाजिक कार्यकर्ते वसंत मांगू पावरा, जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील आणि स्थानिक पंचायत समिती सदस्य सौ. लताबाई जितेंद्र राजपूत यांच्या प्रमुख उपस्थित होते.
महाराणा प्रताप मित्र मंडळ, महिला बचत गट, अंगणवाडी व आरोग्य सेविका यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत नांथे यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी सरपंच नेपालसिंह राजपूत,
उपसरपंच सौ.बालूबाई राजेंद्र राजपूत,पंचायत समिती सदस्य सौ.लताबाई जितेंद्र राजपूत,माजी सरपंच भाऊसाहेब महेंद्रसिंह राजपूत,माजी सरपंच जयपाल सिंह राजपूत,
माजी उपसरपंच अरविंद सिंह राजपूत,ग्रामपंचायत सदस्य प्रदीप सिंह राजपूत ,सौ.संगीता राजपूत, सौ.मंगलाबाई राजपूत, सौ.सरलाबाई राजपूत, जितेंद्र सिंह राजपूत,
भटेसिंह राजपूत,सुदाम सिंह राजपूत ,संग्राम सिंह राजपूत, गोविंद सिंह राजपूत,रोशन राजपूत, सनी राजपूत, निखिल राजपूत, नरेंद्रसिंह पवार, कैलास पवार, राहुल राजपूत, पंकज राजपूत ,अक्षय राजपूत, जगदीश पवार, नितीन राजपूत यांच्यासह गावातील तरुण युवक ज्येष्ठ नागरिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी व पंचक्रोशीतील सरपंच उपसरपंच व राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Click now https://youtu.be/_xt5DyFPRYs?si=kA9hSkkm8LgVTDRo