बातमी कट्टा:- ग्राम विकास तसेच शैक्षणिक विकासाचे ध्येय बाळगून दिवंगत गुरुजनांचा शिकवणीवर गुरुजनांच्या स्मृतीप्रित्यर्थ सलग 12 वर्षांपासून अविरतपणे नवनवीन उपक्रमातून कुरखळी गावचे नाव लौकिक करणारा कुरखळी ग्राम सर्वांगिण विकास मंच आज 13 व्या वर्षीच्या नियोजनात चिराईदेवी बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहू नये, तसेच प्रत्येक विद्यार्थी हा भारत देशाचे भविष्य असून त्यांच्या विकासासाठी कर्तव्यदक्षतेने उत्कृष्टपणे उपक्रमशील काम करणाऱ्या शिक्षकांना दि 12 सप्टेंबर 2022 या दिवशीच्या ‘ज्ञानदिपक आदर्श शिक्षक पुरस्कार”सन्मान सोहळ्यात ट्रॉपी व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
पुरस्कार देणाऱ्या संस्था व घोषित पुरस्कार पहिला पुरस्कार कुरखळी ग्रामविकास मंच व चिराई देवी बहुउद्देशीय संस्था शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.दीपक मोरे (शिक्षक) व स्व. निताबाई मोरे(शिक्षिका) ह्या कुरखळी गावातील शिक्षकांच्या कार्यास व त्यांच्या पावन स्मृतीस स्मरून ज्ञानदीपक आदर्श शिक्षक पुरस्कार देन्यात येत असतो. तसेच दुसरा पुरस्कार शिरपूर तालुक्यातील सर्व शिक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण करणारे स्व.हिरामण कुंभार गुरुजी यांच्या कार्यास नमन करून स्व.हिरामण कुंभार आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देण्यात येणार आहे.
तिसरा पुरस्कार तालुक्यातील युवा तंत्रस्नेही शिक्षकांप्रती युवकांना प्रेरणा देणाऱ्या स्व.गिरीष मोरे यांच्या स्मरणार्थ युवा तंत्रस्नेही आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
दि 12 सप्टेंबर 2003 साली कुरखळीतील शिक्षक स्व. दिपक मुरलीधर मोरे, शिक्षिका स्व. निताबाई भगवंत मोरे, स्व. प्रमोद मुरलीधर मोरे यांचा कर्तव्यावरून घरी परतत असतांना अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या अध्यापणाखाली शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा स्मृतिदिनानिमित्त नवीन उपक्रमांची मोहीम राबवायला 2009 साली सुरवात केली. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढावी तसेच विविध क्षेत्रात बालवयापासूनच पारंगत व्हावे यासाठी उपक्रमाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबीर, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, पर्यावरण पुरक होळी, गणपती, रंगपंचमी सारखे कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचे काम होत असत.
गेल्या पाच वर्षापासून
कुरखळी विकास मंचचे प्रमुख योगेश्वर मोरे व माजी विद्यार्थी यांच्या मार्फत विविध समाज उपयोगी कार्य होत असताना कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या 51 अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते. तसेच मागील वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांसाठी आदर्श शिक्षक पुरस्कार सुरू करण्यात आलेले आहेत. हे सर्व पुरस्कार सुरू करण्यामागे पंचायत समिती आयटीसीचे प्रमुख श्री मनोहर वाघ यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन वेळोवेळी लाभत आहे.
पुरस्काराचे मानकरी पुढील प्रमाणे
कुरखळी सर्वांगीण विकास मंच, कुरखळी व चिराई देवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अर्थे ,यांच्या संयुक्त विद्यमाने गुरु स्मृतिदिनानिमित्त
ज्ञानदीप आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी
हेमंत कृष्णा शेटे – म ज्योतिबा फुले हायस्कुल, शिरपूर
अभिमान मंगा पाटील – जि प शाळा बाळदे
गजेंद्र पांढुरंग जाधव – आर सी पटेल, शिरपूर
शेख इम्रान शेख लुकमान – नगर पालिका शाळा क्र 5
निलेश जनार्दन चोपडे – के वी टि आर सी बी एस इ, शिरपूर
श्री. हेमराज फकीरा अहिरे – महादेव आदिवासी माध्य. आश्रम शाळा,अनेर डॅम
ज्ञाननिता आदर्श शिक्षिका पुरस्काराचे मानकरी
उषा अशोक मनोरे – ए आर पटेल सी बी एस इ, शिरपूर
स्व.गिरीष मोरे यांच्या स्मरणार्थ युवा तंत्रस्नेही आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत
प्रतिभा रमेश बारी – जि प शाळा, अर्थे
गणेश वासुदेव सोनवणे – जि प शाळा, वाठोडा
स्व. हिरामण कुंभार आदर्श मुख्याध्यापक
सुनंदा धनराज पवार – जि प शाळा हाडाखेड, केंद्र सांगवी
रवींद्र मोतीराम पाटील – जि प शाळा जातोडा, केंद्र जातोडा
यशवंत विनायक निकम – जि प शाळा टेम्भेपाडा,केंद्र बोराडी


