बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील 33 ग्रामपंचायतींचे आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात मजूर वर्गाने मतदानाचा हक्क बजावून आपापल्या शेतीकामाला जात आहेत. पळासनेर, निमझरी, सांगवी, या ग्रामपंचायतीत चुरशीची लढाई पाहायला मिळत आहे.
सुरळीत सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेचा तहसीलदार आबा महाजन यांनी सांगवी, पळासनेर सह इतर मतदान केंद्रावर जाऊन पाहणी घेतला. तर आबा महाजन यांनी तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्याबाबत आवाहन केले.
शिरपूर तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीच्या मतदान प्रक्रियेत जिल्हाभरातून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आभाळ भरून आल्याचे वातावरण असतांना पावसानेदेखील मतदार राजांवर मेहरबानी दाखवली असे म्हणता येईल.
https://youtu.be/A9J9xCAn2CA