शिरपूर तालुक्यात आणखी एक खून ! या खूना मागील सुत्रधार कोण ?

बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील तरडी शिवारातील मक्याच्या शेतात एकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे ओढणीच्या साहाय्याने पाठीमागे दोन्ही हात बांधून त्याच ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.याप्रकरणी थाळनेर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तरडी शिवारात गोविंद हिरालाल परदेशी यांच्या मक्याच्या शेतात काल दि २४ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अनोळखी कुजलेल्या अवस्थेत पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला.मयत व्यक्तीच्या हातावर मुकेश असे गोंदलेले असून ओढणीच्या साहाय्याने दोन्ही हात पाठीमागे बांधून त्याच ओढणीने गळा आवळुन जीवे ठार मारण्यात आल्याचे दिसून आले.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी थाळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले होते.याबाबत मोतीलाल बाबुलाल परदेशी वय ६० यांनी थाळनेर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल केला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: