
बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील सावळदे गावात धक्कादायक घटना घडली आहे.गाव परिसरात पत्ते खेळू नका बोलण्याचा राग आल्याने चक्क तलवारी आणि लॉखंडी रॉड घेऊन उपसरपंचांच्या घरात गावगुंडांनी हल्ला केला आहे.शांतप्रीय तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरपूर तालुक्यात लोकप्रतिनिंधीवर अशा प्रकारे हल्ला म्हणजे दुर्दैव म्हणावे लागेल.याप्रकरणी सरपंच महासंघाने देखील उपविभागीय पोलिस अधीकारी यांना निवेदन दिले आहे.
सविस्तर व्हिडीओ बातमीसाठी फेसबुक लिंक क्लिक करा https://www.facebook.com/share/v/A9Mj4mTCRr46pxQh/?mibextid=xfxF2i
गांजा तष्करी,अवैध दारु किंवा अवैध व्यवसाय शिरपूर तालुक्यात विशेष राहिले नाही मात्र आता चक्क लोकप्रतिनिधींवर किंवा त्यांच्या घरांवर हल्ला चढवणे म्हणजे अवघड झाले आहे. शिरपूर तालुक्यात लोकप्रतिनिधीच्या घरांवर हल्ले होत असतील तर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेच काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बघा फेसबुक व्हिडीओ https://www.facebook.com/share/v/A9Mj4mTCRr46pxQh/?mibextid=xfxF2i
सावळदे येथील उपसरपंच यांच्या घरावर हल्ला होणे म्हणजे कायदा सुव्यवस्थेचे अक्षरशः तिनतेरा झाल्याचे चित्र दिसून येत आहे. सावळदे येथील उपसरपंच सचिन राजपूत यांनी थाळनेर पोलिस स्टेशनात फिर्याद दाखल केली आहे. त्या फिर्यादीत म्हटले नुसार सावळदे गाव परिसरात काही तरुण पत्ते खेळत असल्याचे उपसरपंच सचिन राजपूत यांना समजले.त्यांनी याबाबत संबधीत पत्ते खेळणारे मुकेश उर्फ पप्पु कोळी व नारायण उर्फ गेंद्या भिल यांना दि १३ रोजी सकाळी बोलवून पत्ते खेळवू नये अशी समज दिली.
बघा फेसबुक व्हिडीओ https://www.facebook.com/share/v/A9Mj4mTCRr46pxQh/?mibextid=xfxF2i
त्यानंतर दि १४ रोजी उपसरपंच सचिन राजपूत यांना रोजी दुपारी दोन वाजता मुकेश कोळी याने सचिन राजपूत यांना फोन करुन तु आमचा मालक आहे का ? गाव तुझे आहे का ?तुझा काय संबध आम्हाला बोलण्याचा,तु या भानगडीत पडू नको नाय तर तुझा कांड करून टाकू अशी धमकी देत सचिन राजपूत यांना त्यांंना समाजावून फोन ठेऊन दिला.
बघा फेसबुक व्हिडीओ https://www.facebook.com/share/v/A9Mj4mTCRr46pxQh/?mibextid=xfxF2i
त्यानंतर सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास उपसरपंच सचिन राजपूत हॉटेलवर असतांना भाऊ श्रीपाल राजपूत यांनी सचिन राजपूत यांना फोनवर सांगितले की सावळदे गावातील मुकेश उर्फ पप्पु प्रल्हाद कोळी,नारायण उर्फ गेंद्या देवीदास भिल,गणपत ज्ञानेश्वर सोनवणे,नितीन भगवान भिल ,सुखदेव ऊर्फ सुख्या भगवान कोळी व इतर ४ -५ इसम हातात तलवार लोखंडी रॉड हातात घेऊन घरात घुसले व घरातील लोकांना जोरजोरात बोलू लागले की सचिन कुठे त्याला आज जिवे ठार मारायचे आहे.यावेळी घरी नसल्याचे सांगिद्यानंतर घरात संसारोपयोगी साहित्य इकडे तिकडे फेकण्यास सुरुवात केली यावेळी श्रीपाल याने अडविण्याचा प्रयत्न केला असता नारायण भिल व गणपत भिल यांनी त्यांचे हात व पाय दाबून धरले त्यावेळी मुकेश कोळी याने श्रीपाल यास तलावरीचा धाक दाखवून त्याचे गळ्यातील १५ ग्रँम सोन्याची चैन बळजबरीने हिसकावून धकलून दिल्याची फिर्याद उपसरपंच सचिन राजपूत यांनी दिली आहे.
बघा फेसबुक व्हिडीओ https://www.facebook.com/share/v/A9Mj4mTCRr46pxQh/?mibextid=xfxF2i