बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातल १७ ग्रामपंचायत निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला.यात बोराडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती त्यामुळे आज १६ ग्रामपंचायतींची सकाळी दहा वाजता शिरपूर तहसील कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार आबा महाजन यांच्या नियंत्रणाखाली मतमोजणी संपन्न झाली.
या १७ ग्रामपंचायतींमध्ये भाजपाने वर्चस्व मिळवले आहे.या निवडणुकीच्या आधी झालेल्या निवडणूकीत देखील ३३ पैकी ३२ ग्रामपंचायतीत आमदार अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विजय मिळवला होता आता पुन्हा अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली १७ ग्रामपंचायतींवर भाजप पक्षाने मुसंडी मारली आहे.