शिरपूर तालुक्यात भाजप पक्षाची बाजी ! मतमोजणीचा निकाल जाहीर,कोणाला किती मते ? वाचा सविस्तर….

बातमी कट्टा:- तालुक्यातील पंचायत समितीच्या आठ गणांसाठी सुरु असलेल्या पोटनिवडणुकीत पाच सप्टेंबरला सहा गणांच्या 63 केंद्रांवर मतदान झाले होते यात दोन गण यापूर्वीच बिनविरोध झाले आहेत. आज दि 6 रोजी शिरपूर तहसील कार्यालय येथे झालेल्या मतमोजणीत भाजप पक्षाचे उमेदवारांनी बाजी मारली असून 6 गणात सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने इतर मागास प्रवर्गाबाबत दिलेल्या निकालामुळे तालुक्यातील विखरण, करवंद, अर्थे खुर्द, तर्‍हाडी त.त., वनावल, जातोडा, शिंगावे आणि अजनाड या आठ गणांची पोटनिवडणूक जाहीर झाली होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीत विखरण गण बिनविरोध झाला होता विखरण गणातून विनीता मोहन पाटील या बिनविरोध उमेदवार घोषित तर माघार घेण्याच्या मुदतीत करवंद गण बिनविरोध झाला होता करवंद गणात यतीश सुनिल सोनवणे यांना बिनविरोध घोषित करण्यात आले. त्यामुळे उर्वरित सहा गणांसाठी पाच सप्टेंबरला मतदान झाले असून आज सहा सप्टेंबरला मतमोजणी झाली.एकूण सहा टेबलांवर मतमोजणी झाली असल्याने एका तासात सर्व निकाल जाहीर करण्यात आले. 

शिरपूर तहसील कार्यालयात आज सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरवात झाली होती.यात शिरपूर तालुक्यातील सहा गणांमध्ये 12 उमेदवारांना मिळालेल्या मतांची मतमोजणी करण्यात आली. शिरपूर तालुक्यात 6 गणांमध्ये 6 भाजप पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

उमेदवारांना मिळालेले मते,गण व विजयी उमेदवार खालील प्रमाणे

अर्थे : गण भाजप विजयी
एकुण मते :-5702
भाजप – संगीता शशिकांत पाटील :-3151
राष्ट्रवादी काँग्रेस – अश्विनी सुधीर चव्हाण :- 1840
अपक्ष – सुरेखा सुनील पाटील :-513
नोटा :- 118
…….
तऱ्हाडी त.त :- गण भाजप विजयी
एकुण मते :- 5221
भाजपा – प्रतिभा कैलास भामरे :-2651
राष्ट्रवादी काँग्रेस – कल्पना विलास भामरे :-2458
नोटा :- 112
….
वनावल :- गण भाजप विजयी
एकुण मते :- 5612
भाजपा – ममता ईश्वर चौधरी :-3691
राष्ट्रवादी – कांतीलाल परशराम धनगर :-1500
अपक्ष – चेतन हरी चित्ते :- 346
नोटा:-75
….
जातोडा :-गण भाजप विजयी
एकुण मते :- 5026
भाजपा – विठाबाई निंबा पाटील :- 3591
काँग्रेस – सुवर्णा जयेश पाटील :- 1363
नोटा : 72


शिंगावे :-गण भाजप विजयी
एकुण मते:- 6783
भाजपा – चंद्रकांत दामोदर पाटील :- 3772
राष्ट्रवादी – रमाकांत आनंदराव पाटील :- 2887
नोटा:- 124
….
अजनाड :- गण भाजप विजयी
एकुण मते:- 4811
भाजपा – रेखाबाई दर्यावसिंग जाधव :-3177
शिवसेना – सुमित्रा दीपक ठेलारी :-1489
नोटा:- 145

WhatsApp
Follow by Email
error: