बातमी कट्टा:- कुऱ्हाडीने घाव घालत पत्नीचा खून केल्याची खळबळजनक घटना काल दि 18 रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. महिलेचा मृतदेह शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरातील लोकांना उपजिल्हा रुग्णालयात आणल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भुमिका मृत महिलेच्या माहेरच्या मंडळींनी घेतली आहे.नटवाडे येथे सहा महिन्यात खूनाची ही दुसरी घटना घडली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील नटवाडे येथे रात्री आठ वाजेच्या सुमारास गीताबाई रामलाल पावरा वय 45 हिचा कुऱ्हाडीचा घाव घालत खून करण्यात आल्याची घटना गुरुवार 18 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली आहे.
फिर्यादीत म्हटल्यानुसार मयत महिलेचा पती रामलाल हजाऱ्या पावरा वय 50 याने तपकिर मागितल्याने तपकीर दिली नसल्याच्या रागातून त्याने पत्नी गीताबाई पावरा हिच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची तक्रार मयत महिलेचे वडिल मुलसिंग आवा पावरा वय 60 रा परधानदेवी पोस्ट उमर्दा ता शिरपुर यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
नातेवाईकांनी सांगितले नुसार गीताबाई पावरा या पती रामलाल पावर याच्या सोबत रक्षाबंधनासाठी माहेरी पर्धानदेवी पोस्ट उमर्दा ता.शिरपूर येथे गेले होते.दि 18 रोजी सायंकाळी मोटरसायकलीने ते परत नटवाडे येथे आले.मात्र रात्री 8 वाजेच्या सुमारास गीताबाई पावरा हिचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याचे उघड झाले.
घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.मृतदेह शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. गीताबाई पावरा यांच्या माहेर कडील नातेवाईकांना माहिती मिळताच नातेवाईक मंडळींनी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.जोपर्यंत गीताबाई हिच्या सासरच्या घरातील सदस्यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात आणत नाहीत तोवर मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भुमिका मयत महिलेच्या नातेवाईकांनी घेतली आहे.उपजिल्हा रुग्णालयात शिरपूर पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.