
बातमी कट्टा :- शिरपूर येथे प्रविण शिरसाठ यांच्या आवलमाता प्राथमिक भुजलाशयीन मत्यव्यवसाय सह. अंतुर्ली संस्थेच्या वतीने मच्छीमार करणाऱ्या आदिवासींसाठी साहित्य वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आला होता.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत,खासदार हिना गावीत व नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावीत यांच्यासह शिरपूर तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी मोठ्या प्रमाणात आदिवासी नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.

यावेळी खासदार हिना गावीत बोलतांना म्हणाले की,
मासेमारी करणाऱ्या लोकांना शासकीय योजनेतून मदत मिळावी यासाठी माझे वडील आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी आदिवासी विभागातून एक योजना बनवून मासेमारी व्यवसाय करणाऱ्यांसाठी वेगवेगळ्या वस्तू देण्यासाठी प्रयत्न सुरु केला आहे.
नवीन संकल्पनातून व्यवसाय करणे आवश्यक आहे.डँम किंवा नदीतून नवनवीन पध्दतीने मासेमारी साठी अभ्यास करणे गरजेचे आहे. प्रत्येक लोकांसाठी कशी मदत होईल प्रत्येकाचा विकास कसा होईल ,रोजगार कसा उपलब्ध होईल हा विचार सुरु असतो.मत्स व्यवसायिकांसाठी नवीन काही करता येईल का ? यासाठी मत्स विभागाचे पुस्तक घेतले असून त्याचा अभ्यास केला.
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात मासे बिज बनविण्याचे सेटंर नसून त्याचे सेंटर उभे करण्यासाठी केंद्राकडून काही मदत मिळेल का यासाठी प्रयत्न सुरु आहे. या व्यरिक्त आदिवासी तरुणांनी पुढे येऊन मत्स खाद्य चा कारखाना तयार करु शकतात यासाठी केंद्र सरकार निधी मंजूर करुन देणार आहे.पिंजरे पध्दतीने मासेंची शेती करावी.पिंजरा पध्दतीने मत्स व्यवसाय केला तर चार पट्टीने उत्पन्न मिळु शकते.या योजनेत 60 टक्के निधी मिळतो.आदिवासी विभागातून यासाठी शंब्बर टक्के मोफत पिंजरे मिळवण्यासाठी प्रयत्न करु,पारंपरागत पध्दतीने न करता थोड पुढे जाऊन मत्स व्यवसायाची बाहेर विक्री करु शकतात., शिरपूर,शहादा,नंदुरबार परिसरात मत्स साठी कारखाना टाकून रोजगार देता येऊ शकतो.
खर तर मत्स बाबत मला हा ऐवढा अभ्यास व आवड ही फक्त आईंमुळे आहे. कारण आई मत्स या विषयावर पि एच डी झाले असून वेगवेगळ्या मासेंबाबत माहिती त्यांच्याकडून मिळत असते.यासोबतच घरकुल आणि रेशकार्ड बाबतची माहिती यावेळी खासदार हिना गावीत यांनी दिली.
यावेळी नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावीत यांनी विविध योजनांची माहिती दिली.वेळीच योजनांचे अर्ज दाखल न केल्यामुळे आलेला निधी हा परत जातो आणि योजनांच्या लाभापासून वंचित रहावे लागते.यामुळे वेळीच अर्ज दाखल करावा व विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन सुप्रिया गावीत यांनी उपस्थितांना केले.