बातमी कट्टा:- शिरपूर शहरातील पाच मालमत्ता मिळकत थकबाकीधारकांवर शिरपूर नगरपरिषदेच्या पथकाने कारवाई केली.यावेळी मालमत्ता सिल करत कारवाई करण्यात आली असून कारवाईसाठी नगरपरिषदेच्या अधिकारींसह कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी (आय.ए.एस) सत्यम गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज दि २ रोजी थकबाकी असलेल्या मालमत्तांना सिल करत कारवाई करण्यात आली.यात पाच मालमत्तांना कारवाई करण्यात आली असून यातील एका मालमत्ताधारकाने कारवाईनंतर तात्काळ थकबाकी नगरपरिषदेला भरणा केला आहे.
यात शिरपूर नगरपरिषदेच्या पथकाने किसान ज्ञानोदय मंडळ धुळे संचलित होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज शिरपूर,अशोक कुमार मदनलाल अग्रवाल चेअ. अग्री प्रो मार्केट कमिटी शिरपूर,निसर्ग फॉरेस्ट इंडिया,बन्सीलाल हिरालाल अग्रवाल,यश रेस्टॉरंट व बिअरबार आदीं ठिकाणी पथक पोहचून सिलची कारवाई करणयात आली.पथकाच्या कारवाई नंतर किसान ज्ञानोदय मंडळ धुळे संचलित होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज शिरपूर यांनी शिरपूर नगरपरिषदेला थकबाकीचा भरणा केला आहे.


