बातमी कट्टा:- माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, माजी नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने शिरपूर वरवाडे नगर परिषदेत नवीन “वॉटर कम फोम टेंडर” हे सुमारे 50 लाख रुपये किंमतीचे नवीन “अत्याधुनिक अग्निशमन वाहन” 5 सप्टेंबर 2022 रोजी दाखल झाले आहे.
सदर वाहन हे महाराष्ट्र अग्निशमन योजना (जिल्हास्तर) यांच्याकडून आलेल्या अनुदानातून खरेदी करण्यात आले असून सदर वाहनात 100 लिटर फोम टॅंक क्षमता व 3000 लिटर पाणी क्षमता आहे. 50 लाख रुपये किंमतीचे हे अत्याधुनिक अग्निशमन वाहन दाखल झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
सदर वाहनाचे लोकार्पण शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे प्रशासक तथा शिरपूर उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे, शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष राजगोपाल भंडारी, नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी, नगर अभियंता माधवराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लेखा परीक्षक मयूर शर्मा, वाहन विभाग प्रमुख जयवंत माळी, निवडणूक शाखा प्रमुख भाईदास भोई, बांधकाम विभागाचे सुनील सोनवणे, नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


