बातमी कट्टा:- शिरपूर येथील बाजार समितीच्या संचालकपदाच्या 18 जागांसाठी सायंकाळी 5:30 वाजता शिरपूर बाजार समितीच्या आरकेव्हीवाय गोदामात मतमोजणी प्रक्रिया पार पडली यात अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शेतकरी विकास पॅनलने सर्व जागांवर विजय प्राप्त केला आहे.याआधी आमदार अमरिशभाई पटेल काँग्रेस पक्षात असल्याने साहजिकच शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते मात्र आता आमदार अमरिशभाई पटेल भाजप पक्षात असल्याने प्रथमच शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती भाजपाच्या ताब्यात आली आहे.
यात विजय उमेदवार पुढील प्रमाणे
ग्रामपंचायत मतदारसंघात
पाटील लक्ष्मीकांत बापूराव (दहिवद) मते 793
राऊळ आनंदसिंग दर्यावसिंग (करवंद) मते 719
पावरा जगन सुपा (उमर्दा) मते 769
मिलींद दौलतराव पाटील (हिंगोणी) मते 777
डॉ. गुजराथी किरण बद्रीनाथ (अर्थे) 672
जमादार शांतीलाल इंद्रसिंग (आढे) 657
(महिला राखीव)
पाटील मेघा राजेंद्र (खामखेडा) मते 689
मराठी मनिषा राजकपूर (उंटावद) मते 691
पाटील अरविंददास आनंदा (तरडी) 662
पाटील कांतीलाल दगा (जापोरा) 624
पाटील चंदू धोंडु (अजंदे) मत 653
पाटील प्रसाद मोहन (शिरपूर) मते 762
पावरा कृष्णा गेंदाराम (आंबे) मते 730
पाटील शिवाजी धनगर (जवखेडा) 601
महाजन विठोबा सीताराम (सावळदे) 559
व्यापारी मतदार संघात
अरपीत अग्रवाल ऊर्फ हनी अपक्ष (शिरपूर) मते 76
सतिश दगडूलाल जैन अपक्ष(शिरपूर) मते 72
हमाल व तोलारी मतदारसंघात
किरण जतन कढरे अपक्ष (शिरपूर) मते 163