शिरपूर वरवाडे नगरपरिषदेचा सन 2022-2023 या वित्तीय वर्षाचा 156.53 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प

बातमी कट्टा : शिरपूर वरवाडे नगरपरिषदेचा सन 2022-2023 या वित्तीय वर्षाचा 156.53 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.सन 2022-23 या वित्तीय वर्षाचे एकूण अंदाजपत्रक रक्कम रु. 156.53 कोटी असून दि. 28/02/2022 रोजीच्‍या सभेत मंजूर करण्यात आले आहे. सन 2022-23 या वित्तीय वर्षाच्या अंदाजपत्रकात महसूली उत्पन्न रु. 40.20 कोटी, भांडवली उत्पन्न रक्कम रु. 41.55 कोटी व इतर उत्पन्न रु. 8.02 कोटी इतके अपेक्षित आहे. यात आरंभीची शिल्लक रुपये 66.75 कोटी रुपये इतकी अपेक्षित आहे.

जमेच्या महत्वाच्या तरतुदी :

या उत्पन्नात घरपट्टी पासून रुपये 410 लक्ष, पाणीपट्टी पासून रु. 375 लक्ष, दुकान भाडे पासून रु. 85 लक्ष, बाजार रोजभाडे रु. 30 लक्ष, विकास करापासून रु. 60 लक्ष, रिक्रिएशन गार्डनपासून व ऍ़म्युझमेंट पार्क पासून उत्पन्न रु. 90 लक्ष, दवाखान्यापासून रु. 605 लक्ष, नागरी सुविधा उत्पन्न रु. 300 लक्ष, नळ कनेक्शन फी रुपये 20.75 लक्ष अपेक्षित आहे. शासकीय अनुदान रु. 1606.60 लक्ष अपेक्षित आहे. वरील दर्शविलेल्या फी व्यक्तीरिक्त इतर फी रक्कम रु. 437.92 लक्ष अपेक्षित आहे. भांडवली अनुदान रस्ता अनुदान रु. 50 लक्ष, पंधरावा वित्त आयोग अनुदान रु. 5000 लक्ष, पर्यटन व विकास योजना अनुदान रु. 25 लक्ष, सु.ज.यो. नगरोत्थान अभियान (जिल्हास्तर) अनुदान रु. 300 लक्ष, दलित वस्ती अनुदान रु. 300 लक्ष, रमाई आवास योजना रु. 50 लक्ष, आमदार व खासदार निधी रु. 150 लक्ष, नगर रचना अनुदान रु. 30 लक्ष, वैशिष्ट्ये पूर्ण अनुदान रु. 38 लक्ष, पंतप्रधान आवास योजना रु. 1000 लक्ष, अल्‍पसंख्यांक अनुदान रु. 10 लक्ष, सुवर्ण जयंती नगरोत्‍थान अंर्तगत रस्‍ते विकास प्रकल्प रु. 1627 लक्ष, दलितेतर अनुदान रु. 10 लक्ष, अग्निशामक अनुदान रु. 35 लक्ष अपेक्षित आहे.

खर्चाच्या महत्वाच्या तरतुदी :

सिमेंट कॅाक्रीट रोड रुपये 5000 लक्ष, डांबरी रोड रुपये 25 लक्ष, कच्चे रोड 25 लक्ष, नविन दवाखाना बाधंकाम करणे रु. 485 लक्ष, प्राथमिक शाळांना डिजीटल करणे रु. 50 लक्ष, पंतप्रधान आवास योजना रु. 1000 लक्ष, शिरपूर शहरात उर्वरीत राहिलेल्‍या ठिकाणी भुयारी गटार बनविणे रु. 400 लक्ष, जमिन संपादन करणे रु. 400 लक्ष, शॉपिंग सेंटर बांधकाम रु. 200 लक्ष, जिमनॅशिअम हॉल/ओपन जिम रु. 50 लक्ष, पाणीपुरवठा पाईप लाईन टाकणे रु. 300 लक्ष, दवाखाना यंत्रसामग्री खरेदी रु. 150 लक्ष, रस्‍त्‍यावरील दिवाबत्‍ती रु. 75 लक्ष, कंपाऊंड वॉल बांधकाम रु. 300 लाख, समाज मंदिर बांधकाम व इलेक्‍ट्रीफिकेशन करणे रु. 16 लक्ष, ऍम्‍युझमेन्‍ट पार्क भांडवली साठी रु. 75 लक्ष, रमाई आवास घरकूल रु. 50 लक्ष, आरोग्‍य विभागासाठी व इतर कामासाठी वाहन खरेदी रु. 100 लक्ष, व नगरपरिषद कार्यालय बांधकाम व फर्निचर इ. साठी रु. 2.50 लक्ष, बागेसाठी उपकरणे खरेदी करणे रु. 30 लक्ष, नगरपरिषद यंत्रणा साठी सोलर पॅनल खरेदी करणे रु. 100 लक्ष इ. अपेक्षित आहे.

सन 2022-23 या वर्षात एकूण खर्च रुपये 156.53 कोटी इतका अपेक्षित असून महसूली खर्च रक्कम रु. 44.14 कोटी, भांडवली खर्च रु.89.28 कोटी व इतर खर्च रु.23.09 कोटी अपेक्षित आहे. यात आजअखेर शिल्लक रु. 1.66 लक्ष इतकी अपेक्षित आहे.

माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या मागदर्शनाने व शिरपूर वरवाडे नगरपरिषदेचे प्रशासक प्रमोद भामरे यांनी सभेत मार्गदर्शन केले. मुख्याधिकारी तुषार नेरकर, प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी यांनी अंदाजपत्रकाची विस्‍तृत माहिती सभेत सादर केली. नगर अभियंता माधवराव पाटील, अंतर्गत लेखा परीक्षक मयूर शर्मा व मोहन जडिये यांनी सभेत वार्षिक अंदाजपत्रकाचे कामकाज पाहिले.

WhatsApp
Follow by Email
error: