
बातमी कट्टा:येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षात अत्यंत मोठी आणि खळबळजनक घडामोड घडली आहे. जिल्हा परिषद सदस्या बेबीबाई पावरा यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पत्रकारांशी बोलतांना बेबीबाई पावरा यांनी आपली महत्त्वाकांक्षा उघड केली. त्यांच्या या भूमिकेनंतर शिरपूर विधानसभेत भाजप कोणाला संधी देतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सात ऑक्टोबरला शिरपूर शहरातील शासकीय विश्रामगृहात बेबीबाई पावरा व ॲड. भगतसिंग पाडवी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी डॉ.जितेंद्र युवराज ठाकूर यांना अनुसूचित जमाती प्रमाण पत्र तपासणी समिती नंदुरबार यांच्या मार्फत ठाकूर अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आलेले आहे. त्या विरुद्ध आदिवासी नोकर वर्ग ठाकूर व ठाकर समाज उत्कर्ष संस्था यांच्यामार्फत आक्षेप नोंदविण्यात आला आहे व धुळे समिती पुढे तक्रार दाखल करण्यात आली आहे.धुळे समिती मार्फत डॉ ठाकूर यांचे वैधता प्रमाणपत्राची सत्यता तपासणीसाठी त्यांना नोटीस बजावण्यात आली होती व त्यांचे प्रकरण फेर पडताळीतही करण्यात आले होते. संस्थेमार्फत ॲड.भगतसिंग पाडवी यांनी समितीपुढे मौखिक व लिखीत स्वरुपात सादरीकरण करण्यात आले होते.सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुध्दा आदेश पारीत न करता नोटीस परत घेण्यात आली आहे. त्या विरूद्ध संस्थे मार्फत उच्च न्यायालय, औरंगाबाद येथे रिट पिटीशन दाखल करण्यात आले आहे. नंतर मा.न्यायालयाने डॉ जितेंद्र महाले यांना नोटीस निर्गमित करण्याबाबत आदेश केल्याची माहिती पाडवी यांनी दिली.
बेबीबाई कुटवाल पावरा या.हिसाळे यांनी डॉ जितेंद्र युवराज ठाकूर यांच्या विरोधात याचिका दाखल केल्याची माहिती दिली. यावेळी बोलतांना बेबीबाई पावरा यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाकडून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बेबीबाई पावरा यांनी पत्रकारांशी बोलतांना विधानसभा निवडणुक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे मत व्यक्त केले आहे. आतापर्यंत शांत असलेले निवडणुकीचे वातावरण बेबीबाई पावरा यांच्या दाव्याने तापले असून प्रथमच एका महिलेस शिरपूर तालुक्यातून संधी देऊन भाजप इतिहास घडवेल का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.