
बातमी कट्टा:- शिरपूर तालुका विधानसभा निवडणुकीचे अपक्ष उमेदवार डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी आज दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता शहरातील रामसिंग नगर येथील शिव मंदिराचे दर्शन घेऊन शहरात प्रचाराला सुरुवात केली. यानंतर बस स्टँड परिसर गुजराती कॉम्प्लेक्स, व मेन रोड वरील विजय स्तंभपर्यंत प्रचार फेरी काढून मतदारांशी संवाद साधला.

डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी आज शहरातील प्रचाराचा शुभारंभ केला.रामसिंग नगर येथून बसस्थानक गुजराथी कॉम्प्लेक्स वकील कॉलनी पासून पाच कंदील पर्यंत प्रचार करण्यात आला. रस्त्यावर असलेल्या छोटे दुकानदार ,ठेले वाले,व्यवसायिकांना प्रत्यक्ष भेटून डॉ ठाकूर यांनी मतदानाची विनंती केली. यावेळी सामान्य नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. यावेळी मतदारांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेत , मतदारांचे स्वागत आणि आशीर्वाद घेऊन त्यांनी अगदी साधेपणाने ही प्रचार फेरी पूर्ण केली.
प्रचार रॅली समर्थकांची गर्दी असल्यास मतदारांशी संवाद साधता येत नाही, व सामान्य मतदाराला उमेदवारापर्यंत पोहोचता येत नाही, त्यामुळे उमेदवाराने मतदारांपर्यंत पोहोचावे आणि मतदाराने देखील उमेदवारापर्यंत पोहोचावे आणि समस्या समजून घ्याव्यात यासाठी आपणही साधेपणाने रॅली केली असे मत डॉक्टर ठाकूर यांनी मांडले.
त्यामुळे भ्रमक प्रचार करण्यापेक्षा थेट मतदारांच्या मनातील अडचणी समजून घेत , त्यांच्यासाठी कसे काम करता येईल याचे नियोजन करून प्रत्येक सामान्य मतदारापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न मी करत आहे. आणि मतदारांच्या विश्वास संपादन करण्याच्या प्रयत्न करत आहे असे मत डॉ जितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केले.