शिरपूर शहरात वृक्षारोपण मोहीम!राष्ट्रीय हरित सेना व कृषी अभ्यासक यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण!

बातमी कट्टा:- शिरपूर स्कूल ऑफ अँग्रिकल्चरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एस व्ही के एम च्या निम्स कॅम्पसमध्ये प्राध्यापक सदस्य डॉ. मोहम्मद फैसल (एन एस एस, प्रभारी) आणि डॉ. राजेंद्रगौडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एन एस एस शिबिरांतर्गत "वृक्षारोपण मोहीम" आयोजित करण्यात आली होती.

शिरपूर शहरातील शहादा रोडजवळील रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करून सुमारे 22 विद्यार्थी व पाहुण्यांनी सक्रिय सहभाग दर्शविला. विद्यार्थ्याने फ्लॅश कार्ड, झाडे लावणे, पर्यावरणाचे रक्षण करण्याचे महत्त्व सांगणारे तक्ते फिरवून सक्रिय उत्साह दाखवला. "गो ग्रीन, सेव्ह अर्थ" आणि "मी नव्हे तर तुम्ही " या संदेशाने कार्यक्रमाची सांगता झाली. एनएमआयएस कॅम्पस अंतर्गत बिएससीच्या (ऑनर्स) कृषी, प्रथम वर्षात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शिरपूर शहरात कुलपती अमरीशभाई पटेल, डॉ. अक्षय मल्होत्रा(निम्स कॅम्पस डायरेक्टर) राहुल दांडे(मुख्य प्रशासक),डॉ. सुशीलेंद्र देसाई (डीन,एस ए एस टी, एनएमआयएस). आदरणीय पाहुणे योगेश सोनवणे (कृषी अनुदान अधिकारी), योगेश्वर मोरे(सदस्य राष्ट्रीय हरित सेना)सामाजिक वनीकरण परिक्षेत्र शिरपूर, आणि "ग्रीन आर्मी"चे सदस्य धीरज राजपूत यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

WhatsApp
Follow by Email
error: