
बातमी कट्टा:- मध्यप्रदेश राज्यातून महाराष्ट्राकडे येणाऱ्या 49 लाखांचा अवैध विदेशी दारुंवर शिरपूर शहर पोलीसांनी कारवाई केली आहे. बोराडी -वाडीमार्गे आयशर वाहन येत असतांंना ही कारवाई करण्यात आली असून घटनास्थळावरून संशयित पसार झाले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार दि 4 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ए.एस आगरकर यांना गोपणीय माहिती प्राप्त झाली होती.त्या माहिती नुसार पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरणार यांनी शोध पथकासह शिरपूर तालुक्यातील वाडी येथे 11 वाजेच्या सुमारास सापळा लावला असता आर.जे 19 जी एस 8482 क्रमांकाची आयशर येतांना दिसली .पोलीसांना बघून आयशर चालकाने पुन्हा आयशर बोराडी मार्गे जोराने जावु लागल्याने त्याचा संशय आल्याने पोलीसांनी पाठलाग केला असता बोराडी गावाजवळ अंधाराचा फायदा घेत आयशर सोडून चालक घटनास्थळावरून फरार झाला.
पोलीसांनी घटनास्थळी आयशर वाहनाची पाहणी केली असता त्यात 49 लाख 1 हजार 180 रुपये किंमतीची विदेशी दारु व त्या सोबत 30 लाख किंमतीची आयशर असा 79 लाख 21 हजारांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त करत चालक,मालक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जप्त करण्यात आलेली विदेशी दारु फक्त पंजाब राज्यात विक्रीसाठी परवानगीचा असतांंआ ती महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी बेकायदेशीर रित्या चोरटी वाहतूक करतांना आढळून आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे,उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक ए एस आगरकर, उपनिरीक्षक संदिप मुरकुटे, संदिप दरवडे,हेमंत खैरणार व गणेश कुटे यांच्यासह शोध पथकातील ललीत पाटील, प्रेमसिंग गिरासे,रविंद्र आखडमल,प्रमोद ईशी,योगेश दाभाडे,गोविंद कोळी,विनोद अखडमल,भटु साळुंखे ,सचिन वाघ,मनोज दाभाडे,मनोज महाजन,प्रशांत पवार,दिपक खैरणार,विवेकानंदन जाधव,भुपेश गांगुर्डे,मोहन सुर्यवंशी, सुशिलकुमार गांगुर्डे, शांतीलाल पावर व रविंद्र महाले,होमगार्ड मिथुन पवार,शरद पारधी,चेतन भावसार आदींनी केली आहे.