बातमी कट्टा:– शिरपूर सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासंदर्भातची सर्वसाधारण बैठकीचे आज आयोजन करण्यात आले होते.यासाठी जास्तीत जास्त संख्येने शेतकरी सभासदांनी उपस्थित रहाण्यासंदर्भात आमंत्रित केले होते.कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णयाला आम्ही देखील एकमुखाने पाठिंबा दर्शवत आहोत.मात्र शेतकऱ्यांचा हंगामाचा विचार करुनच कारखाना सुरु करावा कुठलाही राजकीय हंगाम बघू नये अस सुचक वक्तव्य डॉ जितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केले.
शिरपूर सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासंदर्भातची सर्वसाधारण बैठकीनंतर डॉ जितेंद्र ठाकूर, सुभाषसिंह जमादार,मोहन पाटील,गोपल राजपूत, कल्पेशसिंह जमादार,ओंकार जाधव आदींसह शेतकरी फाऊंडेशन,शेतकरी संघर्षतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यादरम्यान डॉ जितेंद्र ठाकूर बोलतांना म्हणाले की,गेल्या
8 ते 10 वर्षांपासून सुरु असलेल्या संघर्षानंतर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा विचार करण्यात आला आहे.साखर कालखाना सुरू करण्यासाठी प्रबोधन सभा,बैलगाडी मोर्चा ,शासनाच्या दारी पाठपुरावा केला,दोन महिन्यांपूर्वी सहकार मंत्री यांच्या अध्यक्षखाली व्यापक बैठक झाली.
दिलेलेआश्वासन पुर्ण केले नाही तर त्यांच्या विरुध्द आंदोलन करु,अभी नही तो कभी नही शेतकरी सभासद बांधवांनी संघर्षासाठी तयार रहावे आमदार अमरिश पटेल भाजप पक्षात असून केंद्रात व राज्यात भाजपचेच सरकार आहे. त्यांंना कुठलीही पळवाट नाही त्यांनी राजकीय वजन वापरून अडचण दुर करण्यासाठी प्रयत्न करावा असे यावेळी डॉ जितेंद्र ठाकूर यांनी सांगितले.