बातमी कट्टा:- बनावट खत विक्री करणाऱ्या विरुध्द जळगाव व धुळे जिल्हा कृषी विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली असून तीन संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सापळा रचत पथकाने किरणा दुकानाच्या गोडावूनवर छापा टाकत एकुण ९६ हजार ९०० रूपये किंमतीचा बनावट खतांचा साठा जप्त केला आहे.
याबाबत थाळनेर पोलीस स्टेशनात तीन संशयित विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यात चोपडा तालुक्यातील हातेड खु येथील शेतकरी किशोर आत्माराम पाटील वय ४५ यांनी खताबाबत तक्रार केली होती.याबाबत कृषी विभागाने प्रथमदर्शनी खतांची चाचपणी केली असता खत बनावट असल्याचे लक्षात आले.याबाबत विचारले असता सदर खत तोंदे गावातील मंगलचंद झुंबरलाल जैन यांच्याकडून एम ओ पी (म्युरीट ऑफ पोटॅश) खताच्या ७ बॅग्स घेतल्याचे सांगितले.
नाशिक विभाग विभागीय कृषि सहसंचालक मोहन वाघ ,कुन तड़वी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी धुळे,संभाजी ठाकुर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगाव यांच्या मार्गदर्शन व आदेशानुसार कारवाईसाठी सापळयाचे नियोजन केले व चोपडा तालुका कृषि अधिकारी व जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक अरुण श्रीराम तायडे व विजय पवार मोहीन अधिकारी जळगाव व धुळे जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक द्वारा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार रमेश शिसोदे, योगेश गिरास कु.अ.प. स.शिरपुर यांच्यासह शिरपूर तालुक्यातील तोंडे गावातील संशयीत ठिकाणी म्हणजेच सुरजमल मोहनलाल जैन यांच्या किराणा दुकानाच्या गोदामात छापा टाकला असता त्या ठिकाणी एम ओ पी (आय पी एल कंपनीच्या बनाव खताच्या 57 बॅग प्रति बॅग 50 किलो वजनाच्या आढळून आले खताच्या बॅग्जचे निरीक्षण केले असता आयपीएल कंपनीची नक्कल केल्याचे प्रथमदशी दिसुन आले सदर खतबॅग्ज वर बॅच नंबर आढळुन आला नसून ऑरीजनल बॅगचा रंग व नकली बॅग्जचा रंग व छपाइ या मध्ये बरीच तफावत आढळुन आली
सदर गोडाउन मालकास विचारले असता त्याने सांगितले की सदरचा खत साठा हा कैलास वासुदेव पाटील रा. तोंदे यांनी घरात कापूस भरलेला असुन खते ठेवण्यासाठी जागा नाही. काही दिवस खत राहूद्या अशी विनंती केल्याने ती खते ठेवली आहेत. असा लेखी कबुली जबाब सुरजमल मोहनलाल जैन यांनी दिला यावरून कैलास वासुदेव पाटील यांनी सदरचे बनावट खत विक्रीसाठी आणले हे सिध्द झाले होते.
कैलास पाटील यांना सुरजमल जैन यांच्या भ्रमाण ध्वनी वरून विचारणा केली असता सदरचे खते हे किशोर शालीकराव पाटील रा. करवंद यांनी बिगर बीलाचे दिले असल्याचे सांगत इतर उडवा उडवीची उत्तरे दिली यामुळे खताबाबत बनावाट असल्याचे पक्के मत झाले. खताच्या 57 बॅग प्रति बॅग 50 किलो वजनाची,एक बॅग किमत 1700 असा एकुल मुददेमाल 96 हजार 900 किमतीचा मुददेमाल त्याच गोडावून मध्ये ठेवुन गोडाउन पंचासमक्ष सिलबंद केले व गोडाउनची चावी सुरजमल मोहनलाल जैन
यांचेकडे सुपूर्द करून खतसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी सपुर्द करून खतसाठा सुरक्षित ठेवणे बाबत सुचित करण्यात आले.
कैलास वासुदेव पाटील यांच्या कबुली जबाब नुसार त्यांना बनावाट आयपीएल कंपनीचे त्यांना किशोर शालीकराव पाटील मु.पो.करवंद ता.शिरपूर यांनी दिल्याचे कबुली जवाबत दिले आहे. व सदरचे खत शेतक-यांना विक्री कामी दिले होते. व सुरजमल जैन यांच्या जबाबानुसार कैलास वासुदेव पाटील यांनी विनंती केल्याने हे खत साठवनुकीसाठी दिले होते.
तोंदे गावात साठवणूक केलेले खत हे हातेड खु ता चोपडा येथील शेतकरी किशोर आत्माराम पाटील यांना मंगलचंद शुबललाल जैन रा. तोंद यांनी प्रती बॅग 1700 रुपये प्रमाणे विक्री केली आहे. सदर प्रकरणी सखोल चौकशी केली असता सुरजमल मोहनलाल जैन यांचा नकली एम ओ पी नं आयपीएल कंपनीचे खत खरेदी अथवा विक्री करण्यामध्ये संबंध आढळुन आला नाही त्यांनी सदर आरोपी विरुध्द कार्यवाहीसाठी यंत्रणेला सहकार्य केले.
सदर संशयितांनी संगनमताने बनावट खत शेतक-यांना विक्रीसाठी आणल्याने शेतक-याची व शासनाची फसवणुक केल्याने मंगलचंद झुंबरलाल जैन रा. तोंदे ता. शिरपुर जि. धुळे, कैलास वासुदेव पाटील रा. तांदे ता. शिरपुर जि. धुळे, किशोर शालिकराव पाटील रा. करवंद ता. शिरपुर जि. धुळे यांच्या विरुध्द थाळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.