बातमी कट्टा:-काल दि ४ रोजी सायंकाळी घडलेल्या खूनाच्या घटनेनंतर शिरपूर शहर पोलीस स्टेशनवर आक्रोश मोर्चा निघाला होता. आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे यावेळी मोर्चेकरींकडून सांगण्यात आले यावेळी मोर्चात मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होते.
शिरपूर शहरातील शिंगावे शिवारातील बालाजी नगर भागात राहणाऱ्या राहुल राजू भोई या २२ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना काल दि ४ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. राहुल भोई याच्या पोटात धारदार शस्त्राने घाव घातल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले असून रक्तबंबाळ अवस्थेत राहुल भोई याला क्रांती नगर भागातील भद्रा चौक येथून शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.यावेळी डॉक्टरांनी तपासून राहुल भोई यास मयत घोषित केले.रुग्णालयात मयत राहुल याच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.खंडेराव महाराज यात्रेच्या पुर्वसंध्येला खूनासारखी गंभीर घटना घडल्याने खळबळ उडाली होती.घटनेची माहिती प्राप्त होताच शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व शोध पथक दाखल होत घटनास्थळी धाव घेतली.शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.पोलीसांकडून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.
या घटनेनंतर आज सकाळी शिरपूर शहरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला यात संशयितांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या मोर्चात महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता.शिरपूर पोलीस स्टेशन आवारात ठिय्या मांडत जोपर्यंत सर्व संशयितांना ताब्यात घेण्यात येत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगण्यात आले.पोलीस निरीक्षक ए.एस आगरकर यांनी योग्य कारवाईची हमी दिली.दोंडाईचा व शिंदखेडा पोलीस निरीक्षक देखील यावेळी पोलीस स्टेशन येथे उपस्थित होते.