बातमी कट्टा:- पती नेहमी दारु पिऊन पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याने अखेर कंटाळून पत्नीनेच पतीला भरपूर दारु पाजून डोक्यात लाटणीने मारहाण करत घरात दोरीच्या साहाय्याने गळाला फास लावून गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना काल दि 1 रोजी सायंकाळी घडली असून संशयित महिलेला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील पुट्यापाडा झेंडेअंजन येथील रामदास सिगरेट पावरा याचा राहत्या घरी संशयास्पद मृतदेह आढळून आला होता.याबाबत सिगरेट देवीसिंग पावरा यांनी शिरपूर शहर पोलीस स्टेशनात खूनाचा गुन्हा दाखल केला होता.त्यात वनजमिनीच्या वादातून खून झाल्याचे नमूद करण्यात आले होते.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी कसून चौकशी केली असता रामदास पावरा यांची पत्नी सुनंदा उर्फ बेबीबाई रामदास पावरा हि घटना घडल्यापासून घर सोडून पळून गेल्याची माहिती पोलीसांना मिळाली पोलीसांनी सुनंदा ऊर्फ बेबीबाई पावरा हिचा शोध घेतला ती शिरपूर तालुक्यातील खैरखुटी येथे मिळुन आली.पोलीसांनी तीला ताब्यात घेत चौकशी केली असता खूनाची कबूली दिली.
संशयित सुनंदा उर्फ बेबीबाई पावरा हिला पती मयत रामदास पावरा हा नेहमी दारु पिऊन मानससिक व शारीरिक त्रास देत होता.त्रासाला कंटाळून पत्नी सुनंदा ऊर्फ बेबीबाई पावरा हिनेच पती रामदास पावरा याला भरपूर दारु पाजून लाटण्याने डोक्यावर मारहाण करत दोरीच्या साहाय्याने गळ्याला फास लावत गळा आवळून खून केला व तेथून पळून गेल्याची कबूली दिली आहे.
सदर आरोपीचा शोध होणे कामी पोलीस अधिक्षक संजय बारकुंड अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे व पोलीस निरिक्षक अंसाराम आगरकर अति. कार्यभार उपविभागिय पोलीस अधिकारी शिरपूर विभाग शिरपूर, वरिष्ठ पोलीस निरिक्षक हेमंत पाटील स्था. गुन्हे शाखा यांचे मार्गर्शनाखाली शिरपूर तालूका पोलीस स्टेशनचे सपोनि जयेश खलाणे, पोसई/संदीप पाटील, पोसई/सुनिल वसावे, पोसई/कृष्णा पाटील, असई / जयराज शिंदे, असई कैलास जाधव, पोहेकॉ / ११४४ संजय सुर्यवंशी, पोहेकॉ / ९७४ गंगाधर सोनवणे, पोहेकॉ/८२ कैलास कोळी, पोहेकॉ / ५७८ खसावद, पोना/ १३२८ अनिल शिरसाठ, पोना/९६९ सुनिल साळुंखे, पोकॉ/१६७७ योगेश मोरे, पोकॉ/९१८ रोहिदास पावरा, पोकॉ/१४५४ संजय भोई, पोकों / १४६४ कृष्णा पावरा, पोकॉ/१७ इसरार फारुकी, मपोना/९३३ आश्वनी चौधरी, अश्यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी केली आहे.