बातमी कट्टा :- घरातील एकुलता एक असलेल्या २२ वर्षीय तरुणाचा भरवस्तीत तिक्ष्ण हत्याराने खून केल्याची खळबळजनक आज दि ४ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे.घटनेनंतर उपजिल्हा रुग्णालयात युवकाची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहरातील शिंगावे शिवारातील बालाजी नगर भागात राहणाऱ्या राहुल राजू भोई या २२ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना घडली आहे.धारदार शस्त्राने पोटात वार करुन खून करण्यात आला आहे.मयत राहुल भोई याच्या पोटात धारदार शस्त्राने घाव घातल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले असून रक्तबंबाळ अवस्थेत राहुल भोई याला क्रांती नगर भागातील भद्रा चौक येथून शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.यावेळी डॉक्टरांनी तपासून राहुल भोई यास मयत घोषित केले आहे.रुग्णालयात मयत राहुल याच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.खंडेराव महाराज यात्रेच्या पुर्वसंध्येला खूनासारखी गंभीर घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती प्राप्त होताच शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व शोध पथक दाखल होत घटनास्थळी धाव घेतली आहे. शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.