शिरपूर Breaking news शिरपूरात चोरांची पोलीसांना सलामी, मोटरसायकल,सायकल नाही तर चक्क आयशर चोरीचा प्रयत्न…

बातमी कट्टा:- शिरपूरात चोरांनी कहर केला असून भरवस्तीतून भरदिवसा चक्क मालवाहतूक आयशर वाहन चोरीचा प्रयत्न झाला असून आयशर मध्ये डिझेल कमी असल्याने रस्त्यावर काही किलोमीटर अंतरावर ती आयशर मिळुन आली. शहरात जर चोरांची मालवाहतूक आयशर चोरी करण्यापर्यंत मजल पोहचत असणार तर शहरात पोलीसांचे वचक संपले असेच म्हणावे लागेल. शिरपूरात वाढत असलेल्या चोरी ,गुंडगिरीकडे आता पोलीस अधीक्षकांनी लक्ष देणे गरजेचे असल्याची चर्चा सर्व सामान्य जनतेकडून व्यक्त होत आहे.

काल दि 9 रोजी दुपारच्या सुमारास शिरपूर शहरातील खंडेराव मंदीर परिसरात एम एच 20 ईजी 0859 क्रमांकाची पांढऱ्या रंगाची आयशर वाहन उभी केली व बाजार करण्यासाठी चालक गावात गेला.तेथून परत आले तेव्हा तेथे आयशर मलावाहतूक वाहन दिसून आली नाही. याबाबत चालकाने मालकाला कळवले.मालक व त्यांचे मित्रमंडळी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन शहरातील चौफेर बाजूने आयशरचा शोध सुरु केला.यादरम्यान पोलीसांना देखील माहिती मिळाल्याने पोलीसांकडून देखील शोध सुरु असतांना शोधकार्य दरम्यान आयशर मध्ये डिझेल कमी असल्याने आयशर वाहन शिरपूर तालुक्यातील खर्दे गावाच्या पुढे उभे असल्याचे मिळुन आली.

या आधी देखील शिरपूर शहरातील दादुसिंग कॉलनी परिसरातून स्कार्पीओ वाहन चोरी झाल्याची घटना घडली होणी.आयशर सारखे ऐवढे मोठे वाहन भरदिवसा भरवस्तीतून चोरीची हिम्मत होतीच कशी ? शहरात मोटरसायकल चोरी,चैन स्नॅचिंग,घरफोडी च्या घटना तर होतच आहेत मात्र आता चक्क आयशर चोरीचा प्रयत्न झाल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये चोरांनी दहशत निर्माण केली आहे.सदर आयशर काही किलोमीटरवर अंतरावर तर मिळुन आली मात्र त्या आयशर वाहनाची चोरी करण्याचा प्रयत्न कोणी केला ? चोरी झाली त्या परिसरात सिसिटीव्ही कॅमेऱ्यात चोरी करणाऱ्याचा व्हिडीओ चित्रीत झालाय का ? याबाबत चौकशी होणे आवश्यक आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारी व चोरीच्या घटनेकडे पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरज असल्याची चर्चा सर्व सामान्य जनतेकडून व्यक्त होत आहे.

WhatsApp
Follow by Email
error: