बातमी कट्टा:- धुळे येथे शिवसेनेच्या वतीने विभागीय आयुक्तांसह मुख्य सचिवानकडे तक्रार करण्यात आली आहे.शहरात रिलायन्स जिओ इन्फोकॉम ने नियमबाह्य उभारलेले पोल च्या कामांची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
महानगरपालिका हद्दीमध्ये रिलायन्स जिओ इन्फोकॉम प्रा.लि. पुणे या कंपनीतर्फे इंटरनेट जोडणीसाठी हजारो पोल महापालिका,महसुल विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांमध्ये,बाजुला उभे करण्यात आले असून सदर कामाला महानगरपालिकेची कुठलीही परवानगी नसल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.