बातमी कट्टा:- शिवसेना पक्षाच्या शिरपूरच्या एका पदाधिकारीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आला असून 4 ते 5 वेळा भोसकून ठार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून यांच्यावर धुळे येथे उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहराचे शिवसेना शहर उपप्रमुख प्रविण धनगर उर्फ बंटी लांडगे यांच्यावर शनिवारी ते सकाळी आपल्या शिवभोजन थाळी केंद्रावर जात असतांना त्यांना गोकुळ नामक व्यक्तीने थांबवून 5 हजार रुपये उसनवार मागितले होते.शिवसैनिक बंटी लांडगे यांनी खिशात पैसे नसून रात्री देतो असे सांगितले,रात्री शिवभोजन थाळी केंद्र बंद केल्यानंतर बंटी लांडगे स्कुटीने शहरातील मच्छी बाजारात गोकुळला पैसे देण्यासाठी गेले असता तेथे गोकुळ सोबत बोलतांना रात्री 10:30 वाजेच्या सुमारास अनोळखी संशयिताने धारदार शस्त्राने बंटी लांडगे यांच्यावर अचानक कानाजवळ व पाठीवर वार करत चार ते पाच ठिकाणी भोसकले यामुळे बंटी लांडगे यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने बेशुध्द झाले.त्यांना तात्काळ शिरपूर येथील रुग्णालयातून धुळे येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहे.हल्ल्यामागील कारण मात्र समजू शकलेले नाही.
