बातमी कट्टा:- शिरपूर येथे शिवसेना पदाधिकारी वर झालेल्या जिवघेना हल्ल्याची चौकशी करून हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी यासाठी शिवसेना शिरपूर विधानसभा तर्फे उपविभागीय पोलिस अधिकारी यांना व शिरपूर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

19 रोजी रात्री 10.30 वा शिरपूर शहरातील गजबजलेल्या ठिकाणी मच्छी बाजार येथे शिरपूर शहर शिवसेना उपप्रमुख बंटी लांडगे वय 33 यांच्यावर काही अज्ञात इसमांनी धारधार शस्त्रांनी कानाजवळ व पाठीवर जीवघेणा हल्ला केला त्या हल्ल्यात शिवसेनेचे बंटी लांडगे यांना अतिशय गंभीर अवस्थेत धुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे उपचार घेत आहेत.अशा हल्लेखोरांविरूध्द कड्क कारवाई व्हावी व यामागील पूर्ण पणे कसून चौकशी करून त्याचा पर्दाफाश करावा व या प्रकरणावर सखोल चौकशी व्हावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

यावेळी उपस्थित भरतसिंग राजपूत शिवसेना उपजिल्हाप्रमुख धुळे, जील्हासंघटक विभा जोगराना, तालुका प्रमुख दीपक चोरमले , आत्तरसिग पावरा, राजू टेलर , देवेंद्र पाटील, अभय भदाने, मनोज धनगर, योगेश ठाकरे, मसूद शेख, रवींद्र जाधव, नितीन सोनार, जितेंद्र राठोड, मंगल भाई, अर्चना देसले, वीणा वैद्य, जितेंद्र पाटील, तुषार महाले, सुकलाल पावरा, सागर बारी, दिगंबर राठोड , दिनेश पाटील, गणेश, विजु , सचिन, सूनील, विक्की , राहुल पदाधिकारी, शिवसैनिक व भरतसिंग नगर येथील रहिवासी आणि विषेतः महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.