बातमी कट्टा:– केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल वक्तव्य करून जनतेच्या आणि शिवसैनिकांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला असून केलेल्या वक्तव्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगत मंत्री राणे यांच्या विरुध्दात धुळे शहर पोलीस स्टेशन येथे शिवसैनिकांनी तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री बाबत केलेल्या वक्तव्यामुळे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत.धुळ्यात शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या विरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.केंद्रीय मंत्री राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल अनुदद्गार काढून जनतेच्या आणि शिवसैनिकांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेनेचे नरेंद्र परदेशी यांनी केला. शिवसैनिक नरेंद्र परदेशी यांनी राणेंविरोधात शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत केंद्रीय मंत्री नारायण राणें विरोधात कायदेशीर कारवाईची मागणी शिवसैनिकांनी केली आहे.राणेंच्या या वक्तव्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यताही या तक्रारीत व्यक्त करण्यात आली आहे. राणेंनी जनाशीर्वाद यात्रा धुळ्यातून काढून दाखवावी असे खुले आव्हानही आक्रमक शिवसैनिकांनी राणेंना दिले आहे.नारायण राणे यांच्या विरोध्दात जिल्हाभरात आंदोलन करण्यात येत आहे.